शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

पोटची पोर निघाली चोर, दागिन्यांवर डल्ला

By admin | Updated: June 20, 2014 02:42 IST

बार्देस : करासवाडा-म्हापसा येथील नंदा हरमलकर यांच्या मुलीने घर फोडून घरातील दागिने व रोकड मिळून चार लाखांचा ऐवज लंपास केला होता.

बार्देस : करासवाडा-म्हापसा येथील नंदा हरमलकर यांच्या मुलीने घर फोडून घरातील दागिने व रोकड मिळून चार लाखांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी शिल्पा हरमलकर (२४) या युवतीला अटक करून मुद्देमाल हस्तगत केला. याबाबत म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार दि. १४ रोजी नंदा हरमलकर या सकाळी साडेदहा वाजता आपल्या मुलीला घेऊन वैद्यकीय उपचारासाठी गेल्या होत्या. जाताना घराची चावी व्हरांड्यातील चपलांच्या रॅकमध्ये ठेवली होती. नंदा हरमलकर या दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घरी आल्या असता दरवाजाला चावी लागलेली असल्याचे त्यांना आढळले. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता घरातील दोन्ही कपाटे उघडी दिसली. कपाटातील दोन तोडे, पाच बांगड्या, एक मणी, दोन अंगठ्या व पंधरा हजार रुपयांची रोकड मिळून चार लाखांचा ऐवज चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी म्हापसा पोलिसांत तक्रार दिली होती. म्हापसा पोलिसांनी गुरुवारी शिल्पाला अटक केली. तिने येथील एका पतसंस्थेमध्ये गहाण ठेवलेले दागिने पोलिसांनी हस्तगत केले. तिने हे दागिने गहाण ठेवून १ लाख ५० हजार रुपयांची रोकड काढल्याचेही पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रत्नाकर कळंगुटकर करीत आहेत. (प्रतिनिधी)