शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

गोव्यात मायनिंग कॉरिडोरच्या कामाचा प्रारंभ येत्या महिन्यात, गुड्डेमळ ते कापशे 100 कोटींच्या रस्त्यांचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 6:42 PM

खाण भागात वाहतूक करणा-या ट्रकांमुळे होणारी समस्या दूर करण्यासाठी नव्या रस्त्यांचे जाळे विणणा-या मायनिंग कॉरिडोरच्या कामाचा प्रारंभ येत्या महिन्यात होणार आहे.

पणजी : खाण भागात वाहतूक करणा-या ट्रकांमुळे होणारी समस्या दूर करण्यासाठी नव्या रस्त्यांचे जाळे विणणा-या मायनिंग कॉरिडोरच्या कामाचा प्रारंभ येत्या महिन्यात होणार आहे. साधन सुविधा विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार दीपक पाऊसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण गोव्यात गुड्डेमळ ते कापशे या 100कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याचे काम प्राधान्यक्रमे हाती घेतले जाईल. खनिजवाहू ट्रकांनी मुख्य रस्ते वापरू नयेत यासाठी त्यांच्यासाठी मायनिंग कॉरिडोर असून, वेगळे रस्ते बांधले जातील. खाणपट्ट्यात मुख्य रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी तसेच अपघातांचे प्रमाण त्यामुळे कमी होईल.पाऊसकर म्हणाले की, तिळामळ ते रिवण भागातील रस्त्यांचे काम अडले आहे. या भागातील खाण लिजेस् पर्यावरणीय परवान्यांसाठी रखडल्या आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे मायनिंग कॉरिडोरसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत लवकरच बैठक घेतील. खाणमालकांकडून जमा केलेल्या जिल्हा खनिज निधीतून की राज्य किंवा केंद्र सरकारच्या निधीतून हे काम केले जाईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.वन खात्याकडून या प्रकल्पासाठी लवकरच ना हरकत दाखला दिला जाणार आहे. खाणपट्ट्यासाठी मायनिंग कॉरिडोरची संकल्पना 2011 साली दिगंबर कामत यांनी मुख्यमंत्री असताना आणली होती. परंतु खाण कंपन्यांनी निधी देण्यास नकार दिल्याने हे काम रखडले. त्यानंतर 2012 साली खाणबंदी आली. खाणींपासून जेटींपर्यंत खनिज वाहतूक करणारे ट्रक या मायनिंग कॉरिडोर उपयुक्त ठरणार आहे. गोव्यात ज्या चार ते पाच तालुक्यांमध्ये खाणी आहेत, तेथे खनिज वाहतूक करणारे हजारो ट्रक पूर्वी कार्यरत होते. आता खाणींच्या संख्येवर मर्यादा आल्याने ट्रकही कमी झालेले आहेत. खाणपट्ट्यात वाहतूक करणा-या ट्रकांसाठी मायनिंग कॉरिडोर उपयुक्त ठरणार आहे.

टॅग्स :goaगोवा