आदिवासी विद्यार्थ्यांना क्रीडा प्रोत्साहन: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 12:15 IST2025-06-18T12:14:32+5:302025-06-18T12:15:24+5:30

क्रीडा साहित्याचे वितरण, राज्यभर उपक्रम राबविण्याचे आश्वासन

sports encouragement for tribal students said cm pramod sawant | आदिवासी विद्यार्थ्यांना क्रीडा प्रोत्साहन: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

आदिवासी विद्यार्थ्यांना क्रीडा प्रोत्साहन: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : राज्यातील आदिवासी विद्यार्थी, खेळाडू राष्ट्रीय पातळीवर चमकावेत व त्यांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न केले जातात. ग्रामीण भागातील आदिवासी मुलांनी विविध क्रीडा क्षेत्रात भाग घेताना सातत्याने प्रयत्नरत राहावे व तालुका, राज्य, राष्ट्रीय पातळीवर आपले नाव उज्ज्वल करावे. सरकार त्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य देण्यास सातत्याने प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केले.

गोवा सरकारच्या आदिवासी मंत्रालय अंतर्गत उत्तर गोव्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत क्रीडा साहित्याचे वितरण मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, जिल्हाधिकारी अंकित यादव, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, शंभू घाडी, रोहन कासकर, मनोज सावईकर, गोपाळ सुर्लीकर, नगराध्यक्ष सिद्धी प्रभू, दत्ताराम चिमूलकर व इतर उपस्थित होते. उत्तर गोव्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत क्रीडा साहित्याचे वाटप मुख्यमंत्री सावंत यांच्या वतीने करण्यात आले. दक्षिण गोव्यातही अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

सरकारच्या सर्व घटकांना योजना

सरकार अनेक क्षेत्रात विद्यार्थी व सर्व घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे. मात्र, ज्या योजना आहेत त्यांचा योग्य व्यक्तीला लाभ मिळावा, विद्यार्थ्यांना त्यांचे करिअर, कला, क्रीडा व इतर क्षेत्रात योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी शिक्षकांनीही सातत्याने मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने विचार करणे गरजेचे आहे. शिक्षकांनी सरकारी योजना विद्यार्थी, पालकांपर्यंत पोहोचविणे हे एक प्रकारचे कर्तव्य ठरते, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
 

Web Title: sports encouragement for tribal students said cm pramod sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.