शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे काय होणार? आज ‘सर्वोच्च’ फैसला
2
आजचे राशीभविष्य, २८ नोव्हेंबर २०२५: संयम राखा आणि विचारपूर्वक व्यवहार करा!
3
२ मोठे नेते, २ दावे...राज्यात २ डिसेंबरनंतर राजकीय भूकंप?; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू
4
पहाटे ५ वाजता शिंदेसेनेच्या आमदाराच्या घरी १०० पोलिसांची धाड; घराची झाडाझडती, भाजपावर आरोप
5
महाराष्ट्रासह १० राज्यांतील मेडिकल कॉलेजांवर ईडीचे छापे; ३६ जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
6
राज-उद्धव ठाकरे भेट, ‘शिवतीर्थ’वर बंद दाराआड २ तास चर्चा; एकजुटीने महायुतीला थोपवण्याचा निर्णय?
7
इमारतींच्या छतांवर आणि महामार्गावर आता ‘नो होर्डिंग्ज; मुंबई महापालिकेचे जाहिरात धोरण जाहीर
8
दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल; "मृत्यूला ५ वर्ष झाली, आणखी किती..."
9
सिंधुदुर्गनंतर बदलापूरात पैसे वाटताना रंगेहाथ पकडले; महायुतीत शिंदेसेना-अजित पवार गटात जुंपली
10
श्रेयवाद, आरोप प्रत्यारोप अन् ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर; सत्ताधारी भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष वाढला
11
खराब हवेचे खापर इथिओपियातील ज्वालामुखीवर फोडू नका; प्रदूषणावरून हायकोर्टाने सरकारला सुनावले
12
गर्जेच्या शरीरावरही जखमा, संवादाचे रेकॉर्डिंग पोलिसांकडे; दाेन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी 
13
ठाण्याची झणझणीत मिसळ की पुण्याचे श्रीखंड; शंभराव्या मराठी साहित्य संमेलनासाठी रस्सीखेच?
14
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
15
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
16
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
17
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
18
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
19
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
20
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात होणार्‍या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या क्रिडा प्रकार आणि स्थाने जाहीर 

By समीर नाईक | Updated: August 18, 2023 13:14 IST

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील विविध क्रीडा प्रकारातील लढती पणजी, म्हापसा, मडगाव, फोंडा व वास्कोत होणार आहे.

समीर नाईक/ गोवा 

पणजी : गोव्यात ऑक्टोबर - नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या आगामी ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी आयोजन समितीने होणाऱ्या क्रीडाप्रकारातील स्थाने निश्चित केली आहेत. एकूण ४९ क्रीडा प्रकारांचे आयोजन या स्पर्धेत होणार आहे. 

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील विविध क्रीडा प्रकारातील लढती पणजी, म्हापसा, मडगाव, फोंडा व वास्कोत होणार आहे. राज्यातील एकूण २६ क्रीडा स्थानांवर या स्पर्धा होणार आहेत. तर गोल्फ, सायकलिंगमधील ट्रॅक रेस व शूटिंग या खेळांचे आयोजन मात्र गोव्यात सुविधा नसल्याने नवी दिल्लीतील क्रीडा संकुलात होतील. 

 स्पर्धेतील क्रीडा प्रकार व स्थाने खालीलप्रमाणे : वुशू टेबलटेनिस व रोलबॉल (कांपाल मल्टिपर्पझ इनडोअर स्टेडियम), वेटलिफ्टिंग, स्क्वे मार्शल आर्ट व कबड्डी (कांपाल खुले मैदान), ट्रायथलॉन (करंझाळे मिरामार), जलतरण (कांपाल जलतरण तलाव), लगोरी, इंडियन मार्शल आर्ट, गटका, मल्लखांब, पेंचाक सिलाट व योगा (बांदोडकर कांपाल मैदान), रोविंग (वांयगिणी बीच), यॉटिंग (हवाई बीच दोनापावल), बीच व्हॉलीबॉल, बीच हँडबॉल (मिरामार बीच), फॅन्सिंग, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल (शामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम), अॅथलेटीक्स व रम्बी (बांबोळी स्टेडियम). 

हॉकी (पेडे), बिलियर्ड्स (पेडे), जिम्नॅस्टिक्स, बॉक्सिंग, कुस्ती (पेडे इनडोअर), कॅनोईंग व कयाकिंग, रोविंग (शापोरा नदी), फुटबॉल पुरूष (फातोर्डा), बास्केटबॉल, नेटबॉल, हँडबॉल (मनोहर पर्रीकर स्टेडियम नावेली), सॅपेकटॅकरो, ज्युडो (फातोर्डा इनडोअर), लॉन टेनिस (फातोर्डा), बीच व्हॉलीबॉल (कोलवा बीच), सायकलिंग रोड रेस (वेर्णा- बिर्ला बायपास रोड), मॉडर्न पँटाथ्लोन तायक्वांदो, खो- खो (फोंडा इनडोअर), आर्चरी (अभियांत्रिकी कॉलेज, फर्मागुडी), स्क्वॉश (चिखली), लॉन बॉल्स (चिखली), फुटबॉल महिला (टिळक मैदान, वास्को), गोल्फ (जेपी ग्रीन गोल्फ कोर्स, नवी दिल्ली), सायकलिंग ट्रॅक रेस (इंदिरा गांधी स्टेडियम, नवी दिल्ली), शूटिंग (डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंज, नवी दिल्ली).

टॅग्स :goaगोवा