जिल्हा पंचायतींना खास निधी देणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 11:55 IST2025-12-20T11:54:43+5:302025-12-20T11:55:00+5:30
पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हेही उपस्थित होते.

जिल्हा पंचायतींना खास निधी देणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: सामुहिक शेती, डेअरी, फलोत्पादन आदी क्षेत्रांमध्ये नवनिर्वाचित झेडपींना करण्यासारखे बरेच काही आहे. जिल्हा पंचायतींना यासाठी खास निधी दिला जाईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
पणजी येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हेही उपस्थित होते. सावंत म्हणाले की, माझे सरकार ग्रामीण विकासाला प्रोत्साहन देत आहे.
सरकारने अनधिकृत घरे नियमित करण्यासाठी 'माझे घर' योजना आणली. या योजनेला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुरवातीला या योजनेस विरोध करणाऱ्या विरोधकांनी नंतर स्वतःच अर्ज वाटण्याचे काम सुरू केले. लोक कल्याणकारी अनेक उपक्रम आम्ही राबवत आहोत. 'माझे घर', 'विकसित भारत', 'विकसित गोवा' व नव्या पिढीच्या भवितव्यासाठी या निवडणुकीत मतदान करावे.'
जि. पं. निवडणुकीत भाजप ३५ हून अधिक जागा जिंकणार असल्याचा सावंत यांनी केला. ते म्हणाले की, 'चार ते पाच ठिकाणी अटीतटीच्या लढती आहेत. परंतु त्या मतदारसंघांमध्येही भाजप बाजी मारणार आहे. दोन्ही जिल्हा पंचायतींवर भाजपचाच झेंडा फडकणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.