सोनिया गांधी सुटीसाठी गोव्यात; घेतला सायकलिंगचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 03:56 IST2017-12-28T03:55:54+5:302017-12-28T03:56:06+5:30

काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाची धुरा राहुल गांधी यांच्या हाती सोपविल्यानंतर निश्चिंत झालेल्या सोनिया गांधी गोव्यात सुट्टीवर आल्या आहेत. २६ डिसेंबर रोजी त्या दिल्लीहून गोव्याला रवाना झाल्या होत्या.

Sonia Gandhi for Goa for holidays; Enjoy cycling | सोनिया गांधी सुटीसाठी गोव्यात; घेतला सायकलिंगचा आनंद

सोनिया गांधी सुटीसाठी गोव्यात; घेतला सायकलिंगचा आनंद

मडगाव : काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाची धुरा राहुल गांधी यांच्या हाती सोपविल्यानंतर निश्चिंत झालेल्या सोनिया गांधी गोव्यात सुट्टीवर आल्या आहेत. २६ डिसेंबर रोजी त्या दिल्लीहून गोव्याला रवाना झाल्या होत्या. दक्षिण गोव्यातील लीला या पंचतारांकित हॉटेलमध्ये काही मोजक्या मित्रमंडळींसह त्या आल्या आहेत. सरत्या वर्षाला निरोप देउन नववर्षाचे स्वागत केल्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्या गोव्याचा निरोप घेतील. काँग्रेस अध्यक्ष बनल्यानंतर देशभर दौरे करण्यात राहुल गांधी व्यग्र असताना सोनिया गांधींनी गोव्याला जाणे पसंत केले. बुधवारी सकाळी नाश्त्यात त्यांनी आवडता मसाला डोसा मागविला. त्यानंतर हॉटेलच्या आवारात मनमुराद सायकलिंग केले. तसेच विदेशांतील पाहुण्यांशी चर्चा केली. अनेक चाहत्यांना त्यांनी आपल्यासोबत सेल्फीही घेऊ दिले. योगा करण्याबरोबरच पुस्तकांचे वाचन करून त्या वेळ व्यतित करत आहेत. मात्र बातम्यांपासून दूर राहण्याची खबरदारी त्या घेत आहेत.
>आवडते ठिकाण
सोनिया गांधी राहत असलेले दक्षिण गोव्यातील हे हॉटेल त्यांचे आवडते ठिकाणी असून त्या यापूर्वीही येथे राहिल्या आहेत. मध्यंतरी दिल्लीत प्रदूषणाची पातळी वाढल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी काही दिवसांकरिता गोव्याला प्रयाण केले होते.

Web Title: Sonia Gandhi for Goa for holidays; Enjoy cycling