Sonali Phogat: सोनाली फोगाटच्या घरातील मौल्यवान फर्निचर गायब; महिंद्रा स्कॉर्पिओसह तीन वाहनेही बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 11:30 IST2022-09-06T11:19:49+5:302022-09-06T11:30:11+5:30
भाजप नेत्याच्या घरी पार्क केलेले महागडे फर्निचर आणि महागड्या कार गायब आहेत.

Sonali Phogat: सोनाली फोगाटच्या घरातील मौल्यवान फर्निचर गायब; महिंद्रा स्कॉर्पिओसह तीन वाहनेही बेपत्ता
पणजी- सोनाली फोगाट यांच्या हरयाणा येथील घरातील मौल्यवान फर्निचर व महागड्या गाड्या गायब असल्याची तक्रार सोनाली हिच्या कुटुंबियांनी केली आहे.
भाजप नेत्याच्या घरी पार्क केलेले महागडे फर्निचर आणि महागड्या कार गायब आहेत. तिच्या मृत्यूचा तपास करणाऱ्या गोवा पोलिसांनी हत्येसाठी संशयित सुधीर सांगवान व इतरांना अटक केल्यानंतर गोवा पोलिसांचे एक पथक हरयाणा येथे गेले होते.
सोनाली फोगट यांच्याकडे महिंद्रा स्कॉर्पिओसह तीन वाहने होती, जी सध्या बेपत्ता आहेत. प्लॉटच्या किमतीसह तिच्या फार्महाऊसची किंमत जवळपास ११० कोटी रुपये आहे. राष्ट्रीय माध्यमांच्या वृत्तानुसार होते. सांगवान हा सोनाली हिचे फार्महाऊस २० वर्षांच्या भाडेतत्त्वावर घ्यायचे होते.
पोलिसांना हवी एडविनची कोठडी
सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणातील एक संशयित एडविन नुनीस याला उत्तर गोवा सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत पाठविले असले तरी त्याची कोठडी हणजूण पोलिसांना हवी आहे. त्यासाठी हणजूण पोलिसांनी सत्र न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
सोनाली फोगाट खून प्रकरणात नुनीसला अटक केल्यानंतर काही दिवस हणजूण पोलिसांनी त्याची कोठडीतील चौकशी केली होती. परंतु त्यानंतर नुनीसचे हैदराबाद ड्रग्ज कनेक्शन उघडकीस आले. त्यामुळे या प्रकरणात अधिक चौकशी करण्यासाठी त्याची कोठडी हणजूण पोलिसांना हवी आहे, या प्रकरणात खंडपीठात पोलिसांच्या अर्जावर सुनावणी होणार आहे.