सोनाली फोगाट मृत्यू प्रकरण उपअधिक्षक हाताळणार- प्रमोद सावंत
By किशोर कुबल | Updated: August 30, 2022 14:51 IST2022-08-30T14:51:12+5:302022-08-30T14:51:41+5:30
अभिनेत्री तथा भाजप नेत्या सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणी चौकशीच्या बाबतीत गुप्त अहवाल हरयानाच्या मुख्यमंत्र्यांना सादर केला

सोनाली फोगाट मृत्यू प्रकरण उपअधिक्षक हाताळणार- प्रमोद सावंत
पणजी : अभिनेत्री तथा भाजप नेत्या सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणी चौकशीच्या बाबतीत गुप्त अहवाल हरयानाच्या मुख्यमंत्र्यांना सादर केला असून हे प्रकरण यापुढे उपअधिक्षकपदावरील पोलिस अधिकाऱ्याच्या नेतृत्त्वाखाली हाताळले जाणार आहे. गोवा पोलिसांचे एक पथक हरयानाला पाठवले जाईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.
या प्रकरणात सखोल चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले. हरयानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपविले जावे, असे आवाहन केले होते. फोगाट हिच्या कुटुंबियांकडून हे प्रकरण सीबीआयकडे सोपविले जावे यासाठी खट्टर यांच्यावर दबाव येत आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सावंत यानी परवा गोवा पोलिसांच्या तपासकामावर आपला पूर्ण विश्वास असल्याचे तसेच गरज पडली तरच हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात येईल, असे भाष्य केले होते.