छोट्या खाणींना लवकरच ईसी

By Admin | Updated: June 25, 2014 17:24 IST2014-06-25T17:24:30+5:302014-06-25T17:24:49+5:30

पणजी : गोव्यात ५ हेक्टरहून कमी क्षेत्रफळात छोट्या खनिज खाणी सुरू करण्यासाठी पर्यावरणविषयक दाखले देण्याचा विचार आहे, असे विधान केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री

Short mines soon | छोट्या खाणींना लवकरच ईसी

छोट्या खाणींना लवकरच ईसी

पणजी : गोव्यात ५ हेक्टरहून कमी क्षेत्रफळात छोट्या खनिज खाणी सुरू करण्यासाठी पर्यावरणविषयक दाखले देण्याचा विचार आहे, असे विधान केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी दिल्लीत केले.
खाणमंत्री नरेंद्र सिंग तोमर, मंत्री जावडेकर, केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल आदींची एक संयुक्त बैठक मंगळवारी दिल्लीत झाली. देशातील खनिज व्यवसाय नव्याने सुरू होण्यासाठी या तिन्ही खात्यांमध्ये समन्वय असायला हवा अशा प्रकारचा विचार बैठकीत व्यक्त झाला. काही राज्यांतील ठप्प असलेल्या खाण व्यवसायाचा आढावा घेण्यात आला. खाणींना व अन्य तत्सम प्रकल्पांना पर्यावरणविषयक परवाने देण्यात येणाऱ्या कायदेशीर अडचणींबाबतही चर्चा झाल्याचे सूत्रांनी
सांगितले.
पर्यावरण सांभाळून खनिज व्यवसाय सुरू करायला हवा. कमी क्षेत्रफळात लघू स्वरूपातील खनिज खाणी सुरू करू देता येतील, असाही विचार व्यक्त झाला. त्यासाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची यापुढे फेररचना केली जाणार आहे.
मंडळासमोर अनेक प्रस्ताव प्रलंबित असून ते फेररचनेनंतर निकालात काढले जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय हरित लवादाच्या विविध निवाड्यांमुळे जे प्रश्न उपस्थित होत आहेत त्यावरही बैठकीत ऊहापोह झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
(खास प्रतिनिधी)

Web Title: Short mines soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.