शिवनाथ संस्थानाची १५ डिसेंबरपासून जत्रा; विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2024 11:32 IST2024-12-05T11:29:44+5:302024-12-05T11:32:13+5:30
शिरोडा येथील श्री शिवनाथ संस्थानमध्ये वार्षिक जत्रोत्सव १५ ते २० डिसेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे.

शिवनाथ संस्थानाची १५ डिसेंबरपासून जत्रा; विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : शिरोडा येथील श्री शिवनाथ संस्थानमध्ये वार्षिक जत्रोत्सव १५ ते २० डिसेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
दि. १५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता गवळण काला, त्यानंतर पालखी व अन्य धार्मिक विधी होतील. तर दुपारी आरती व महाप्रसाद, संध्याकाळी ६ वाजता श्री मंडलेश्वर देवाचे श्री शिवनाथ मंदिरात आगमन, त्यानंतर भजनाचा कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम होईल.
दि. १६ डिसेंबर रोजी पहाटे ५:३० वाजता सांगोड, त्यानंतरच रथोत्सव दुपारी १२ वाजता दीपोत्सव तर रात्री ८ वाजता आरती होईल. १७ रोजी सकाळी धार्मिक विधी तर दुपारी आरती, रात्री ८:३० वाजता श्रींची पालखीतून मिरवणूक निघेल. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. १८ रोजी सकाळी धार्मिक विधी, तर दुपारी आरती व रात्री ८:३० वाजता श्रींची अश्वावरून मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होतील.
दि. १९ रोजी सकाळी अभिषेक व अन्य धार्मिक विधी दुपारी आरती तर रात्री ८ वाजता श्रींची सुखासनातून मिरवणूक काढण्यात येईल. त्यानंतर धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. दि. २० रोजी सकाळी धार्मिक विधी, त्यानंतर रात्री ९:३० वाजता श्रीची पालखीतून मिरवणूक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. यावेळी भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थानतर्फे केले आहे.