शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

गोव्याचे राजकीय डबके करणारे आजचे राजकारणी पोर्तुगीज सत्तेचेच वारसदार; शिवसेनेची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 07:27 IST

भाजप ही गोव्यातली खरी ‘बीफ’ पार्टी असून हिंदुत्व हा फक्त मुखवटा, शिवसेनेचा निशाणा.

ठळक मुद्देभाजप ही गोव्यातली खरी ‘बीफ’ पार्टी असून हिंदुत्व हा फक्त मुखवटा, शिवसेनेचा निशाणा.

पुढील वर्षी गोव्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याद्वारे मुख्यमंत्री तुमच्या दारी हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. गोव्यातील एकंदरीत परिस्थितीवर शिवसेनेनं जोरदार टीका केली. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे आता ‘सरकार तुमच्या दारी’ हा उपक्रम साजरा करीत आहेत. त्या उपक्रमात ते जी थापेबाजी करीत आहेत, त्या थापेबाजीवर एखाद्याला प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवता येईल, असे म्हणत शिवसेनेने प्रमोद सावंत यांच्यावर निशाणा साधला.

गोव्यात निवडणुका आल्या की नवे पक्ष, नव्या आघाडय़ा निर्माण होतात, स्वतःचे दोनेक आमदार निवडून आणतात व जे सरकार येईल, त्यांच्यात सामील होऊन स्वतःचे उखळ पांढरे करून घेतात. यात गोव्याचे नुकसानच झाले आहे. गोव्यातील उद्याच्या निवडणुकांत तरी हे चित्र बदलावे. अल्बुकर्कने गोवा जिंकले व ४५० वर्षे पोर्तुगीजांच्या सत्तेखाली ठेवले. गोव्याचे राजकीय डबके करणारे आजचे राजकारणी पोर्तुगीज सत्तेचेच वारसदार आहेत. गोव्यातील थापेबाजीचा अंत व्हावा असे कुणालाच का वाटू नये?, असे म्हणत शिवसेनेने निशाणा साधला आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून यावर टीकेचा बाण सोडला आहे. 

काय म्हटलंय अग्रलेखात ?गोव्यात पर्यटक खूप येतात. सध्या धावत्या पर्यटनाची एक नवी फॅशन निघाली आहे. गोवा आकाराने लहान आहे. म्हणून एका दिवसात गोवा पाहून अनेक लोक परत जातात. काही लोक गोव्यात खास करमणूक नाही, दोन दिवसांतच कंटाळा आला, असे सांगून परत जातात. त्या सर्वांनी निवडणूक मोसमात गोव्यात यायला हवे व मनोरंजनाचा आनंद घ्यायला हवा असे वातावरण सध्या निर्माण झाले आहे. गोव्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. त्यामुळे राजकीय पर्यटनाचा ओघ वाढला आहे. बेडूकही ‘डराव डराव’ करू लागले आहेत व इकडून तिकडे उडय़ा मारू लागले आहेत. हे सर्व बेडूक उडय़ा मारताना राजकीय तत्त्वे, नीतिमत्ता याबाबत डराव डराव करतात, पण त्यामागे ‘सत्ता’ हेच एकमेव सूत्र आहे.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार लुईझिन फालेरो यांनी काँग्रेसचा त्याग केला व आमदारकीचाही राजीनामा दिला. फालेरो हे प. बंगाल निवासी तृणमूल काँग्रेसमध्ये निघाले असल्याचे समजते. फालेरो सांगतात, ‘‘मी नावेलीमधील आपल्या समर्थकांशी चर्चा करून निर्णय घेतला.’’ हा मोठाच विनोद आहे. मतदारांना गृहीत धरून नेता परस्पर निर्णय घेतो व जनतेची फरफट सुरू होते. गोव्यात गेली काही वर्षे जनतेची अशीच फरफट सुरू आहे. भारतीय जनता पक्ष सत्तेवर आहे तो स्वतःच्या ताकदीवर नाही. मागच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजप अल्पमतात होता. काँग्रेस पक्षाने सर्वाधिक 17 आमदार जिंकूनही सत्ता स्थापनेच्या दाव्यास उशीर केला. या काळात भाजपने फोडाफोड करून बहुमत विकत घेतले. हे सर्व काय व कसे घडले हे गोवेकरांना समजले आहे.

भाजपने स्वबळावर 20-25 जागा जिंकून सत्ता मिळवली असती तर त्यांची पाठ थोपटता आली असती, पण गोव्यात तसे काहीच झाले नाही. भारतीय जनता पक्षाच्या सध्याच्या सरकारविरुद्ध लोकांत प्रचंड संताप आहे. कोविड काळात तर सरकारने स्वतःलाच ‘मृत’ घोषित केल्याने गावागावांत कोरोनाने कहर केला व त्यात लोकांचे बळी गेले. गोव्यातील आरोग्य व्यवस्था साफ कोलमडून पडली आहे. सरकारातले मंत्री व त्यांचे कारभारी हे गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटकात फक्त इस्टेटी विकत घेण्यात मशगूल आहेत. 

रोजगाराचा प्रश्नगोव्यात रोजगाराचा प्रश्न भेडसावतो आहे. कोरोनामुळे पर्यटनावर संकट कोसळले व अर्थकारण बिघडले. लोकांच्या चुली थंडावल्या आहेत. त्याच वेळी अमली पदार्थाने अनेक गावांना, समुद्रकिनाऱ्यांना विळखा घातला आहे. कॅसिनो जुगाराच्या बोटी सरकारला खंडणी देतात. त्या खंडणीवर गोव्यासारखे देवांचे राज्य चालवले जात असेल तर तो हिंदुत्वाचा अपमानच म्हणावा लागेल. कॅसिनो जुगाराविरुद्ध लढा देऊन मनोहर पर्रीकरांनी भाजपला गोव्याला रुजवले. तेच भाजप सरकार आज कॅसिनो मालकांचे गुलाम बनले आहे. आता मुख्यमंत्री सावंत सांगतात, गोव्यातील प्रत्येक गाव म्हणे स्वयंपूर्ण करणार. तरुणांना अमली पदार्थांचे व्यसन लावून, जुगाराची चटक लावून तुम्ही गोव्याला स्वयंपूर्ण कसे काय बनविणार ते सांगा. गोव्यातील मुली सुरक्षित नाहीत. सिद्धी नाईक प्रकरण संपलेले नाही व कलंगुट समुद्रकिनाऱ्यावर ज्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडला त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले.

भाजप ही गोव्यातली खरी ‘बीफ’ पार्टीगोव्याच्या खऱ्या प्रश्नांची जाण उरली आहे काय? गोव्याच्या राजकारणात कोण कोठे जाईल व कोणाच्या गळास कोणता मासा लागेल याचा भरवसा नाही. काँग्रेस आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हे गोव्याच्या मातीतले मूळ पक्ष, पण भाऊसाहेब बांदोडकरांसारखा नेता राहिला नाही व त्यांच्या हिंदुत्ववादी पक्षाचे अस्तित्वही उरले नाही. मगो पक्ष भाजपने गिळून ढेकर देऊन पचवला आहे. याला जबाबदार ‘मगो’चे सध्याचे नेतृत्वच आहे. गोव्यातील लोकांना भाजप हा हिंदूंचा तारणहार असा पक्ष वाटत असेल तर ते चूक आहे. भाजपच्या आमदारांच्या यादीवर नजर टाकली तर आम्ही काय सांगतोय ते कळेल.

भाजप ही गोव्यातली खरी ‘बीफ’ पार्टी असून हिंदुत्व हा फक्त मुखवटा आहे. देशात गोवंशहत्या बंदी कायदा लागू आहे, पण गोव्यात हवे तितके ‘बीफ’ म्हणजे गोमांस मिळत आहे, हे ढोंग नाही तर काय? पंतप्रधान मोदी यांना जुगाराचा राग आहे, पण गोव्याच्या समुद्रातील कॅसिनो जुगाराच्या बोटी मंत्र्यांचे खिसे भरत आहेत. या जुगारी व्यवसायातून राजकीय पक्षांना देणग्या मिळतात व निवडणुका लढवल्या जातात. पोर्तुगीजांविरुद्ध लढलेला गोवा या नव्या वसाहतवाद्यांपुढे हतबल झाल्याचे चित्र आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाPramod Sawantप्रमोद सावंतManohar Parrikarमनोहर पर्रीकरBJPभाजपाcongressकाँग्रेसAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसElectionनिवडणूक