शिवसेना गोवा उपाध्यक्षा राखी नाईक यांची नेतृत्त्वावर तोफ; पक्षाला दिली सोडचिठ्ठी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 08:03 PM2021-10-15T20:03:48+5:302021-10-15T20:04:44+5:30

गोवेकरांच्या बाबतीत सेनेला तळमळ नसल्याचा आरोप

Shiv Sena Goa Vice President Rakhi Naik Leave Shivsena party | शिवसेना गोवा उपाध्यक्षा राखी नाईक यांची नेतृत्त्वावर तोफ; पक्षाला दिली सोडचिठ्ठी

शिवसेना गोवा उपाध्यक्षा राखी नाईक यांची नेतृत्त्वावर तोफ; पक्षाला दिली सोडचिठ्ठी

Next

पणजी : शिवसेनेच्या गोवा राज्य उपाध्यक्षा राखी नाईक यांनी पदाचा तसेच पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. गेली चार वर्षे त्या या पक्षात होत्या. शिवसेना सोडताना त्यांनी पक्षाच्या नेतृत्त्वावर तोफ डागली आहे. शिवसेनेला गोवेकरांच्या बाबतीत तळमळ असलेली दिसत नाही.

गोव्यात या पक्षाला कोणतेच भवितव्य नाही. पक्षाचे जे नेते गोव्यात येतात त्यांना गोव्याच्या प्रश्नांवर कोणतेही गांभीर्य दिसत नाही, असे आरोप त्यांनी केले आहेत. श्रीमती नाईक म्हणाल्या की, ‘मी माझ्या सांगे मतदारसंघातील तसेच संपूर्ण गोव्याचे प्रश्न घेऊन सध्या तरी स्वतंत्रपणेच पुढे जाणार आहे. कुठल्याही पक्षाबद्दल विचार केलेला नाही.’

Web Title: Shiv Sena Goa Vice President Rakhi Naik Leave Shivsena party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app