लाचखोर पोलिसांना आश्रय
By Admin | Updated: July 31, 2014 02:25 IST2014-07-31T02:24:09+5:302014-07-31T02:25:33+5:30
पणजी : एका बाजूने चोरट्यांनी राज्यात धुमाकूळ घातला आहे आणि ज्या चोरट्यांना पकडण्यात आले त्या चोरट्यांकडून जप्त करण्यात आलेले

लाचखोर पोलिसांना आश्रय
पणजी : एका बाजूने चोरट्यांनी राज्यात धुमाकूळ घातला आहे आणि ज्या चोरट्यांना पकडण्यात आले त्या चोरट्यांकडून जप्त करण्यात आलेले दागिने ताब्यात घेण्यासाठी पोलीस लोकांकडे लाच मागत आहेत आणि अशा पोलिसांची सरकार पाठराखण करीत असल्याचा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत केला.
प्रश्नोत्तराच्या तासाला अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी हा प्रश्न उपस्थित केला. मडगाव येथील सुनिता सुरेंद्र मळकर्णेकर यांच्या घरी मार्च २०१२ मध्ये दागिन्यांची चोरी झाली होती. नंतर चोरट्यांना पोलिसांनी पकडले होते; परंतु पकडण्यात आलेले दागिने ताब्यात देण्यासाठी पोलिसांनी तक्रारदार महिलेकडे पैसे मागितले होते व ते न दिल्यामुळे आजपर्यंत त्यांना दागिने परत केले नसल्याचा आरोप सरदेसाई यांनी सभागृहात केला. तसे नसल्यास या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी त्यांनी केली.
परंतु, मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर समाधान न झाल्यामुळे पोलिसांची कृती बरोबर वाटत असल्यास या प्रकरणात उपनिरीक्षक डायगो ग्रासियस याला निलंबित का करण्यात आले होते, असा प्रश्न सरदेसाई यांनी केला. सभागृहात त्याच्यावर आरोप झाल्यामुळे त्याला निलंबित करण्यात आले होते; परंतु त्याची काहीही चूक नसल्याचे नंतर तपासातून आढळून आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मडगावचे निरीक्षक सुदेश नाईक यांना निलंबित करण्याची सदस्याची मागणी त्यांनी फेटाळली. निरीक्षक नाईक यांनी तक्रारदार महिलेची पैसे मागून सतावणूक चालविल्याची, तसेच हे संपूर्ण प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळल्याचा आरोप केला.
(प्रतिनिधी)