तिचे जास्त लाड होतात म्हणून बारा वर्षाच्या मुलीचा मोठ्या बहिणीनेच घोटला गळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 22:25 IST2017-08-28T22:25:03+5:302017-08-28T22:25:49+5:30

घरात लहान बहिणीला मिळणारे प्रेम पाहून मत्सरतेने मोठ्या बहिणीने लहान बहिणीचा गळा दाबून खून केला. सांगे तालुक्यातील बेणवाडा येथे रविवारी ही घटना घडल्याचे सोमवारी उघड झाले.

She is very much indebted as the 12-year-old daughter's big sister suffers with a stroke | तिचे जास्त लाड होतात म्हणून बारा वर्षाच्या मुलीचा मोठ्या बहिणीनेच घोटला गळा

तिचे जास्त लाड होतात म्हणून बारा वर्षाच्या मुलीचा मोठ्या बहिणीनेच घोटला गळा

मडगाव, दि. 28 - घरात लहान बहिणीला मिळणारे प्रेम पाहून मत्सरतेने मोठ्या बहिणीने लहान बहिणीचा गळा दाबून खून केला. सांगे तालुक्यातील बेणवाडा येथे रविवारी ही घटना घडल्याचे सोमवारी उघड झाले. दीड दिवसांच्या गणपती मूर्तीचे विसर्जन करुन घरी परतलेल्या काजल पप्पू यादव (वय 12) या छोट्या बहिणीचा गळा दाबून मोठ्या बहिणीने खून केला. सांगे पोलिसांनी 302 कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने तिला सुधारगृहात ठेवले आहे. 
पोलिसांनी सोमवारी सकाळी पप्पू यादवच्या सर्व कुटुंबीयांना चौकशीसाठी सांगे पोलीस ठाण्यात बोलावले होते. पोलिसांनी शेजा-यांना व काजल ज्यांच्या घरी विसर्जनासाठी गेली होती त्यांनाही पोलीस ठाण्यात आणले, पण काही उपयोग होत नव्हता. पोलिसांच्या प्रत्येक प्रश्नाला मोठी बहीण नकारार्थी उत्तरे होती, पोलीस हिसका मिळाल्यावर तिने खुनाची कबूली दिली.
बहिणीने दिलेली कबुली अशी  की, घटनेच्या रात्री काजल आईजवळ झोपण्यासाठी हट्ट करु लागली. आईजवळ झोपून मोबाईलवर गेम खेळता खेळता झोपी गेली, हे मी झोपेचे सोंग घेवून सर्व बघत होते. मी रात्रीचे तीन वाजण्याची वाट पहात होते. मिरवणूक घराशेजारुन जाताना तीन वाजता मी उठले. पाहिले तर आई व काजल गाढ झोपेत होत्या. आईला काहीच न कळता काजलच्या गळ्या भोवती नॉयलॉनची दोरी आवळली. ती तडफडू लागली व गतप्राण झाली. नंतर तिचा श्र्वास सुरु आहे असे पाहून दोन्ही हातांनी तिचा गळा आवळला. इतक्यात आई जागी होत असल्याचे पाहून हळूच माझ्या जागेवर जाऊन झोपले. काजल तडफडत होती हे मी हळूच बघत होते. आई तिला काय झाले असे विचारत होती तोपर्यंत ती गतप्राण झाली होती.
खून का केला या प्रश्नावर तिने सांगितले की, घरातील सगळी मंडळी काजलवर प्रेम करायचे. मला मात्र दुय्यम स्थान दिले जायचे. माझी कोणीच विचारपूस करीत नसत. यामुळे काजलला कायमचे संपवायचे असा निर्णय घेतला. 

Web Title: She is very much indebted as the 12-year-old daughter's big sister suffers with a stroke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा