मुंबईतील केईएम इस्पितळाच्या धर्तीवर गोव्यात अवयव रोपण संघटना स्थापणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 21:17 IST2018-12-09T21:17:08+5:302018-12-09T21:17:19+5:30
मुंबईतील केईएम इस्पितळाने स्थापन केल्याच्या धर्तीवर गोवा सरकार राज्य अवयव रोपण संघटना स्थापन करणार असल्याचे आणि ही प्रक्रिया मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आदेश देण्याआधीच सुरु झालेली आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील केईएम इस्पितळाच्या धर्तीवर गोव्यात अवयव रोपण संघटना स्थापणार
पणजी : मुंबईतील केईएम इस्पितळाने स्थापन केल्याच्या धर्तीवर गोवा सरकार राज्य अवयव रोपण संघटना स्थापन करणार असल्याचे आणि ही प्रक्रिया मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आदेश देण्याआधीच सुरु झालेली आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी स्पष्ट केले.
हायकोर्टाने गेल्याच आठवड्यात सरकारला पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत ‘सोट्टो’ स्थापन करण्यास बजावले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘अंमलबजावणीसाठी काही आर्थिक बाबीही आहेत परंतु तो वेगळा भाग आहे. या संघटनेसाठी प्रशासकीय मंडळ नेमावे लागेल. प्रक्रियेत काही चुका राहू नये यासाठी केईएमच्या एका तज्ञ महिला डॉक्टरचे मार्गदर्शन याबाबत घेतले जात आहे.
‘अवयव रोपणाच्या बाबतीत रजिस्ट्री हवीच. गरजू रुग्णांना अवयव मिळण्यात किंवा दात्यांना अवयव दान करण्यात अडचण येऊ नये, ही सरकारची स्पष्ट भूमिका आहे.’, असे ते म्हणाले. दरम्यान, मँगो फाउंडेशन या संस्थेने हायकोर्टात याचिका सादर करुन गोमेकॉला ‘सोट्टो’ म्हणून अधिसूचित करावे, अशी मागणी केली होती.गोमेकॉत शनिवारी मडकई येथील रवींद्र चंदू नाईक (६४) या रुग्णाने तिसºया मजल्यावरुन उडी टाकून आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर गोमेकॉत सुरक्षा उपाययोजना करण्याचे सरकारने निश्चित केले आहे.
गोमेकॉत सुरक्षा उपाययोजना
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना विचारले असता, गोमेकॉ इमारतीत ग्रील्स बसविणे किंवा तत्सम सुरक्षा विषयक उपाययोजना कराव्या लागतील, असे त्यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वीही या इस्पितळात आत्महत्त्येचा असाचा प्रकार घडला होता त्यामुळे यावर उपाययोजना अनिवार्य बनल्या आहेत.