शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात खुनाची मालिका सुरुच; रुमडामळमध्ये राहत्या घरात एकाची हत्या, दहा दिवसांत पाच खून 

By सूरज.नाईकपवार | Updated: September 1, 2023 17:10 IST

सादीक बेळ्ळारी असे मयताचे नाव असून, झोपलेल्या अवस्थेत असताना त्याच्यावर अज्ञाताने धारदार शस्त्राने सपासप वार केले. 

मडगाव: गोव्यात खुनांची मालिका सुरुच असून, दहा दिवसांत या छोट्याशा राज्यात पाच खूनाची प्रकरणे घडली. आज शुक्रवारी राज्यातील दक्षिण गोवा जिल्ह्यातील रुमडामळ हाउसिंग बोर्ड येथे एका साधारण बावीस वर्षीय युवकाचा त्याच्या राहत्या घरात सकाळी निर्घृणपणे खून करण्यात आला. सादीक बेळ्ळारी असे मयताचे नाव असून, झोपलेल्या अवस्थेत असताना त्याच्यावर अज्ञाताने धारदार शस्त्राने सपासप वार केले. 

रक्ताच्या थारोळ्यात तो निपचित झाला. यानंतर संशयित घटनास्थळाहून फरार झाला. मयत एका खून प्रकरणातील संशयित असून, त्या खुनाचा बदला म्हणूनच त्याचाही काटा काढण्यात आला असल्याचा प्राथमिक कयास आहे. पोलिसही त्या दिशेने तपास करीत आहे. अजूनही पोलिसांना कुठलेही धागेदोरे मिळालेले नाहीत.

सकाळी सव्वा नऊ ते साडेनउ या दरम्यान खुनाची वरील घटना घडली. सादीक हा आपल्या घरात झोपला होता. त्याला सकाळी उशिरा उठण्याची सवय होती. तो घरातील एकुलता एक मुलगा आहे. त्याचे वडील नेहमी प्रमाणे सकाळी कामासाठी बाहेर गेले हाेते. तर आई नंतर काही कामाच्या निमित्याने बाहेर पडली. जाताना तिने घराचा दरवाजा ओढून घेतला होता. त्यावेळी खुन्याने घरात येउन सादीकवर सपासप वार केले.

खुनाची माहिती मिळाल्यानतंर मायणा कुडतरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेउन तपासकामाला सुरुवात केली. मडगाव विभागाचे पोलिस अधिक्षक संतोष देसाई यांनीही घटनास्थळी जाउन पहाणी केली. मायणा कुडतरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई व अन्य पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.

मयताची पार्श्वभूमीही गुन्हेगारी स्वरुपाची आहे. २०२० साली मायणा कुडतरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका खुन प्रकरणात त्याचा सहभाग होता. दवर्ली येथील भगवती कॉलनी येथे खुनाची ही घटना घडली होती. मुहाझीद खान याचा खून झाला होता. या प्रकरणात सादीक व इस्माईल मुल्ला याला नंतर पोलिसांनी अटक केली होती. खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी जाउन तपासकामाला सुरुवात केली. त्या भागातील सीसीटीव्ही कॅमेरांचीही मदत पोलिस घेत आहेत. 

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू