मैत्री करण्याच्या बहाण्याने मुलीला पाठवले अश्लील फोटो; तरुणाला अटक
By काशिराम म्हांबरे | Updated: June 19, 2023 22:21 IST2023-06-19T22:21:52+5:302023-06-19T22:21:55+5:30
पीडितेच्या आईने रविवारी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यात सोशल मीडियावर तिच्या मुलीशी मैत्री करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीने त्याचे अश्लील फोटो पाठवले होते

मैत्री करण्याच्या बहाण्याने मुलीला पाठवले अश्लील फोटो; तरुणाला अटक
म्हापसा - एका अल्पवयीन मुलीला तिच्या इन्स्टाग्रामवर अश्लील छायाचित्रे पाठवल्या प्रकरणी पीर्ण येथील ४० वर्षीय इसमाला कोलवाळ पोलिसांनी अटक केली.
कोलवाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या आईने रविवारी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यात सोशल मीडियावर तिच्या मुलीशी मैत्री करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीने त्याचे अश्लील फोटो पाठवले होते. तसेच पीडितेलाही त्याच प्रकारचे फोटो पाठवण्याची मागणी संशयित तरुणाने केली होती. याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी भादंसंच्या कलम ३५४ (ए), ३५४ (बी) व गोवा बाल कायदा कलम ८ नुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली कोलवाळ पोलिसांनी संशयित आरोपीचा माग काढला आणि त्यास ताब्यात घेतले. अभिषेक सावंत (४०) रा. पीर्ण असे संशयिताचे नाव असून त्यास पोलिसांनी अटक केली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सोनम वेर्णेकर या करीत आहेत.