शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

राजभवनमध्ये पहा म्युझियम, औषधी वाटिका व चर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 18:55 IST

उल्हासनगर कॅम्प नं-3, कल्याण ते अंबरनाथ रस्त्याचे 100 फुटी रुंदीकरण झाले आहे.

पणजी : गोवा मुक्तीनंतर आता प्रथमच दोनापावल काबो येथील राजभवनचे दरवाजे पर्यटकांसाठी खुले होत आहेत. येत्या दि. 5 जानेवारीपासून दुपारी अडिच वाजल्यापासून कुणीही राजभवनचा परिसर पाहू शकेल. राजभवनच्या परिसरातील म्युझियम, औषधी वाटिका, तोफ, चर्च व अन्य खनिजा लोकांनी पाहण्यासाठी खुला होत आहे.

अरबी समुद्राचे विहंगम दृश्य राजभवनच्या ठिकाणी दिसून येते. आतार्पयत केवळ मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्य़ावेळी किंवा राज्यपालांना एखादे निवेदन देण्यासाठी समाजातील ठराविक व्यक्ती व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते राजभवनवर पोहचत होते पण त्यांना राजभवनचा रमणीय प्रदेश पाहण्याचे भाग्य लाभत नव्हते. राजभवनची चर्च देखील पाहता येत नव्हती. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये जावे व सोहळा संपताच बाहेर पडून वाहनात बसून निघून जावे एवढेच घडत होते. आता मात्र प्रत्येक शुक्रवार, शनिवार व रविवारी स्थानिकांसह अगदी विदेशी पर्यटक देखील गोव्याचे राजभवन पाहू शकतील. तिथे फिरून म्युङिायम, औषधी वाटिका व निसर्गाचे सौंदर्य अनुभवू शकतील. टुर गाईडही उपलब्ध केला जाईल. 

एकावेळी पन्नास व्यक्तींचा ताफा राजभवनच्या परिसरात नेला जाईल. दुपारी अडिच वाजता व सायंकाळी चार वाजता अशा दोन टप्प्यांमध्ये प्रत्येकी 50 व्यक्ती तथा पर्यटकांना नेले जाईल. चार वाजता गेलेल्या व्यक्तींना सायंकाळी साडेसहा वाजता परत यावे लागेल. देशात जेवढी राजभवन आहेत, त्या सर्वापेक्षा गोव्याचे राजभवन हे आगळेवेगळे मानले जाते. राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांचा सध्या या वास्तूमध्ये निवास आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती किंवा पंतप्रधानही गोव्यात आले तर राजभवनमध्येच त्यांचा निवास असतो. 

राजभवनला भेट देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने बुकिंग दि. 31 डिसेंबरपासून सुरू झाले आहे. नोंदणी केल्यानंतर पोलिसांकडून पडताळणी केली जाईल व मग भेट निश्चित केली जाईल. अर्जदाराला भेटीची निश्चितता ही मोबाईल एसएमएस किंवा इमेलद्वारे कळविली जाईल. बारा वर्षाहून कमी वयाच्या मुलांना प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. इतरांसाठी मात्र प्रत्येकी तिनशे रुपयांचे शुल्क लागू करण्यात आले असून ते नोंदणीवेळी ऑनलाईन पद्धतीने जमा करावे लागेल. राजभवन परिसरात धूम्रपान करणे, मद्यपान करणे, प्लॅस्टीक किंवा खाद्य पदार्थ नेण्यास मनाई आहे. या सगळ्य़ा टुरची जबाबदारी गोवा पर्यटन विकास महामंडळ घेणार आहे.

टॅग्स :goaगोवा