जमिनीच्या वादातून शेळवण-कुडचडेमध्ये एकाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2018 15:36 IST2018-02-24T15:36:44+5:302018-02-24T15:36:44+5:30

शेळवण-कुडचडे येथे जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीतून सुरक्षा रक्षकाचा खून झाला.

Security Guard Murderd at Shelvan-Curchorem | जमिनीच्या वादातून शेळवण-कुडचडेमध्ये एकाची हत्या

जमिनीच्या वादातून शेळवण-कुडचडेमध्ये एकाची हत्या

मडगाव :  मडगावपासून 18 कि.मी. अंतरावर असलेले शेळवण-कुडचडे येथे जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीतून सुर्यकांत देसाई (44) या सुरक्षा रक्षकाचा खून झाला. या प्रकरणात कुडचडे पोलिसांनी मयताची काकी शेवंती (55) हिला अटक केली असून त्याचा चुलत भाऊ हेमंत हा सध्या फरारी आहे.

ही घटना शुक्रवारी रात्री घडली. सुर्यकांत व हेमंत हे दोघेही एकाच घरात रहात होते. मात्र त्या दोघांतही जमिनीच्या वाटणीवरुन वाद निर्माण झाला होता. शुक्रवारी ते रहात असलेल्या घराभोवती कुंपण घालण्याचे काम चालू केल्याने त्या दोघांमधील वाद शिगेला पोचला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणो याच वादावादीत मयताच्या डोक्यावर लाकडाच्या दंडुक्याने प्रहार केल्याने गंभीर अवस्थेत त्याला मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात आणण्यात आले. मात्र त्याच्यावर उपचार चालू असताना त्याचे निधन झाले. या प्रकरणात आपला हात असल्याची कबुली मयताची काकी शेवंती हिने दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तर फरार हेमंतच्या शोधात पोलीस आहेत. निरीक्षक रवींद्र देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास चालू आहे.
 

Web Title: Security Guard Murderd at Shelvan-Curchorem