शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

'गोव्यात ड्रग्जविरुद्ध विद्यालये गंभीर नाहीत, पोलिसांना मदत करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 19:48 IST

राज्यातील अंमली पदार्थाच्या (ड्रग्ज) विषयाबाबत पोलिसांनी सर्व शैक्षणिक संस्थांना पत्रे लिहिली होती. पण, अनेक विद्यालयांनी पत्राला उत्तरच दिले नाही. यापुढे शिक्षण खाते विद्यालयांचे

पणजी : राज्यातील अंमली पदार्थाच्या (ड्रग्ज) विषयाबाबत पोलिसांनी सर्व शैक्षणिक संस्थांना पत्रे लिहिली होती. पण, अनेक विद्यालयांनी पत्राला उत्तरच दिले नाही. यापुढे शिक्षण खाते विद्यालयांचे शिक्षक, मुख्याध्यापक आदींना ड्रग्जविषयी अधिक संवेदनशील करण्याचा कार्यक्रम हाती घेतील, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले.

अंमली पदार्थाच्या निर्मितीविषयी काँग्रेसचे नावेलीचे आमदार लुईडिन फालेरो यांनी प्रश्न मांडला होता. शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील अंमली पदार्थाचा सुळसुळाट झालेला आहे. विद्यार्थी नव्या पद्धतीच्या ड्रग्जना बळी पडतात, असे फालेरो यांचे म्हणणे होते. काही परिसरांमध्ये ड्रग्जची निर्मितीही होते असल्याचे फालेरो यांनी सांगितले. उत्तरादाखल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की प्रत्येक विद्यार्थी अंमली पदार्थाच्या आहारी गेला आहे, असे कुणीच समजू नये. सगळीकडेच विद्यार्थी ड्रग्ज घेतात असे नाही. तथापि, कुठेही काही घडत असल्यास त्याविषयीची माहिती दिली जावी. कॉलेजचे प्रिन्सीपल, हायस्कुलांचे मुख्याध्यापक, शिक्षक आदींनी शैक्षणिक संस्थांच्या परिसरात ड्रग्जविषयक हालचालींविषयी काही माहिती असल्यास ती कळवायला हवी. पोलिसांनी यापूर्वी सर्वच विद्यालयांना पत्रे लिहिली. अनेकांनी पत्राला उत्तर दिले नाही. यापुढे शिक्षण खाते शिक्षकांमध्ये जागृती करील. विद्यार्थ्यांच्या वर्तनावरुन तो ड्रग्जच्या आहारी गेला आहे की नाही हे कळून येत असते.

केटामिनविषयी डीआरआयला पत्र दरम्यान, सत्तरीत सापडलेल्या केटामिनच्या साठ्याविषयी केंद्र सकारची डायरेक्टोरेट रेव्हीन्यू इंटेलिजन्स (डीआरआय) ही संस्था चौकशी करत आहे. गोवा सरकारने डीआरआयला पत्र लिहिले होते, पण उत्तर काही आले नाही. गोवा सरकार त्याप्रकरणी स्वतंत्रपणे चौकशी करू शकत नाही, कारण केटामिन ड्रग्जचा विषय हा विविध राज्यांशी संबंधित आहे. डीआरआयने अनेक ठिकाणी छापे टाकले होते. गोव्यातही छापा टाकला. आंतरराष्ट्रीय रॅकेटशी केटामिन प्रकरणाचा संबंध आहे. गोवा सरकारची यंत्रणा तपास करू शकत नाही, अशा बहुराज्यीय व आंतरराष्ट्रीय रॅकेट प्रकरणी तपास डीआरआय संस्थाच करू शकते, असे मुख्यमंत्र्यांनी फालेरो यांच्या व प्रतापसिंग राणो यांच्या प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट केले. 

टॅग्स :Drugsअमली पदार्थgoaगोवाPoliceपोलिसCrimeगुन्हा