शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

स्कार्लेट प्रकरणामुळे गोव्याची एक विकृत बाजू उजेडात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 22:06 IST

१८ फेब्रुवारी २००८ रोजी स्कार्लेट हिचा अर्धनग्न मृतदेह हणजूण किना-यावर सापडला होता.

राजू नायक

अत्यंत गाजलेल्या स्कार्लेट किलिंग या षोडशवयीन ब्रिटिश युवतीच्या खुनास जबाबदार असलेल्या शॅक चालक सॅमसन डिसोझा याला उच्च न्यायालयाने १०वर्षाचा सश्रम कारावास ठोठावल्यानंतर गोव्यातील पोलिसांचा हलगर्जीपणा, अनास्था व एकूणच पर्यटनाची स्थिती यावर चांगलाच उजेड पडला आहे. या प्रकरणाला आंतरराष्ट्रीय परिमाण असल्याने गोव्याची खूपच बदनामी झालेली आहे. राज्याच्या पोलिसांना हे प्रकरण व्यवस्थित हाताळता आले नाही, याचे कारण पोलिसांचे साटेलोटे व अनास्था असल्याचा आरोप झाला आहे. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले.

१८ फेब्रुवारी २००८ रोजी स्कार्लेट हिचा अर्धनग्न मृतदेह हणजूण किना-यावर सापडला होता. गुन्हा सिद्ध झालेल्या डिसोझाने तिला अमली पदार्थ दिले, तिच्यावर लैंगिक अत्याचार केले व तिला बेहोश स्थितीत तेथेच टाकून तो पळून गेला होता. दुर्दैवाने पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यू म्हणून या प्रकरणाची नोंद केली. त्यानंतर मात्र स्कार्लेटची आई फियोना हिने सतत १० वर्षे लढा दिला व अखेर तिला न्याय मिळाला आहे. गोव्याच्या शॅकमध्ये ड्रग्स मिळतात हे त्यानिमित्ताने सिद्ध झाले. या खानपानगृहांना स्थानिक नेत्याचे संरक्षण मिळते. त्यातील बरेचसे बेकायदा असतात, त्यांनी किना-यांवर आक्रमण केले आहे, त्यामुळे किना-यांचे पर्यावरण भंग पावते, शिवाय तेथे बरेच अवैध धंदे चालतात. स्कार्लेटच्या आईने या प्रकरणात एका राजकीय नेत्याने आपल्या मुलीला अमली पदार्थ दिल्याचा आरोप केला होता. अनेक विदेशी पर्यटकांनी, व कुविख्यात आंतरराष्ट्रीय समाजकंटकांनीही तसे आरोप केले आहेत. त्या प्रकरणात विधानसभेची एक समितीही नेमण्यात आली होती. परंतु तिच्यात एकमत होऊ शकले नाही व

ज्या नेत्यांवर आरोप झाले ते पुन्हा विधानसभेत परतले!  ड्रग माफिया, पोलीस व नेते यांचे साटेलोटे हा गोव्यात नेहमी चर्चेचा विषय आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही हा विषय नेहमीच चघळला जातो. एका माजी मंत्र्यानेही तसा आरोप केला होता व आपण या व्यवसायाला आडकाठी करतो म्हणून जीवाला धोका निर्माण झाल्याचे म्हटले होते. त्यानंतरही किना-यावरचे पोलीस संरक्षण वाढविण्यात आले नाही. गोव्याच्या अनेक किना-यांवर रात्री काळोख असतो. सीसीटीव्ही किंवा इतर खबरदारीची यंत्रणा नाही की सक्षम पोलीस पहारा नाही. विदेशी पर्यटक नैसर्गिक सुखशांतीबरोबरच स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यासाठीच गोव्यात येतात. त्यामुळे ती मंडळी रात्री एकटीदुकटी फिरतात. विदेशात अनेक ठिकाणी अमली पदार्थावरचे निर्बंध आता उठविण्यात आले आहेत. परंतु तेथे डॉक्टरांची निगराणी असते. येथे उपलब्ध होणारे ड्रग्स कोणत्या प्रकारचे असतात व रासायनिक ड्रग्स तर प्राणघातक असू शकतात. त्या संदर्भात राज्य सरकारकडून कोणतीही जागृती केली जात नाही की वैद्यकीय खबरदारीही घेतली जात नाही. त्यात पोलीस-नेत्यांचे साटेलोटे असल्याने अशी प्रकरणो दडपण्याकडे कल असतो. गोव्यात अशी प्रकरणे दडपली जात असल्याचा आरोप करून ब्रिटनमध्ये एक जागृत नागरिकांचा गटही स्थापन झाला आहे. स्कार्लेट प्रकरणाने त्यावर चांगलाच उजेड पडला व राज्य सकारचेही वाभाडे निघाले आहेत! 

(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत.) 

टॅग्स :goaगोवाMurderखूनRapeबलात्कार