वास्कोसह ‘संभाजी’ उल्लेख १९७१ सालचा

By Admin | Updated: December 3, 2015 01:46 IST2015-12-03T01:46:00+5:302015-12-03T01:46:10+5:30

पणजी : वास्को मतदारसंघातील काही महसुली गावांचा उल्लेख ‘संभाजी’ असा १९७१ सालीच झालेला असल्याचे उघड झाले

'Sambhaji' was mentioned alongside Vasco, 1971 | वास्कोसह ‘संभाजी’ उल्लेख १९७१ सालचा

वास्कोसह ‘संभाजी’ उल्लेख १९७१ सालचा

पणजी : वास्को मतदारसंघातील काही महसुली गावांचा उल्लेख ‘संभाजी’ असा १९७१ सालीच झालेला असल्याचे उघड झाले आहे. सरकारच्या महसूल खात्याने १९७१ साली जारी केलेल्या अधिसूचनेनुसार तसा उल्लेख झाल्याचे २००१च्या जनगणनेवेळीही स्पष्ट झाले आहे. तोच आधार घेऊन नागरी पुरवठा खात्याने आता वास्कोतील काही रेशनकार्डांवर संभाजी-वास्को, असा पत्ता छापला आहे. सरकारने वास्को शहराचे नाव गुपचूपरीत्या संभाजीनगर केल्याचा वाद सध्या वास्कोत निर्माण झाला आहे. (पान २ वर)

Web Title: 'Sambhaji' was mentioned alongside Vasco, 1971