शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

लाखोंच्या भूखंडांची कवडीमोलाने विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 2:30 AM

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : सेरुला कोमुनिदाद घोटाळ्यानंतर आता कोलवाळ कोमुनिदाद भूखंड घोटाळा उघडकीस आला असून कोमुनिदादने सर्व्हे क्रमांक

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : सेरुला कोमुनिदाद घोटाळ्यानंतर आता कोलवाळ कोमुनिदाद भूखंड घोटाळा उघडकीस आला असून कोमुनिदादने सर्व्हे क्रमांक ४३३/० मधील १३३ भूखंड अवघ्या ५० रुपये चौ. मीटर या दराने विकल्याची माहिती कॉँग्रेसचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी सभागृहात दिली. हा घोटाळा असल्याचे मान्य करून महसूलमंत्री रोहन खंवटे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन सभागृहात दिले. कोलवाळ कोमुनिदादचा हा उघडकीस आलेला घोटाळा कोट्यवधी रुपयांचा असल्याचे संकेत मिळत आहेत; कारण हजारो रुपये प्रति चौ. मीटर जमिनीचा दर असलेल्या या भागात कोमुनिदादने अवघ्या ५० रुपये प्रति चौ. मीटर दराने भूखंड विकले आहेत. एक भूखंड ३०० चौ. मीटरचा असून एकूण १३३ भूखंड बनवून ते लाटण्यात आले. बहुतेक भूखंड बिगर गोमंतकीयांनी घेतले आहेत. विक्री करण्यात आलेल्या भूखंडांवर आतापर्यंत १० बंगले उभे राहिले आहेत. याचाच अर्थ हे भूखंड बेकायदेशीररीत्या कोमुनिदाद संहितेचे उल्लंघन करून धनदांडग्यांना विकले गेले आहेत. मोठ्या भ्रष्टाचाराशवाय या हरकती करणे अशक्य असल्याचा दावा हळर्णकर व इतर कॉँग्रेस सदस्यांनी केला आहे. हळर्णकर यांनी विचारलेल्या या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना खंवटे यांनी, या ठिकाणी उभारण्यात आलेले बंगले हे सरकारी परवानगी घेऊन बांधण्यात आलेले नाहीत, असे सांगितले. तसेच सरकारकडे या प्रकरणात अद्याप तक्रार आली नसल्यामुळे कारवाई करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले. परंतु परवानगी न घेता भूखंडांची विक्री करण्यात आली आणि त्या ठिकाणी बंगले बांधण्यात आले याची माहिती जर कोमुनिदाद प्रशासकाला मिळू शकते तर त्यावर कारवाई का होत नाही, असा प्रश्न दिगंबर कामत आणि विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी विचारला.