गोव्यात रशियाचे पहिले चार्टर विमान दाखल, पर्यटक मोसम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 10:20 IST2017-10-01T10:19:48+5:302017-10-01T10:20:05+5:30
519 पर्यटकांना घेऊन रशियाचे पहिले चार्टर विमान आज पहाटे गोव्यात दाखल झाले असून पर्यटक मोसमाची सुरवात झाली आहे.

गोव्यात रशियाचे पहिले चार्टर विमान दाखल, पर्यटक मोसम सुरू
पणजी - 519 पर्यटकांना घेऊन रशियाचे पहिले चार्टर विमान आज पहाटे गोव्यात दाखल झाले असून पर्यटक मोसमाची सुरवात झाली आहे.
पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी यावर्षी चार्टर विमानांचा 1000 चा आकडा पार करील असा विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले की दाबोळी विमानतळावर चार्टर विमानांना वेळच्या संदर्भात असलेली अडचण दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत नव्या पर्यटन मोसमात रशिया , इंग्लंड व तसेच अन्य युरोपियन राष्ट्रांमधून चार्टर विमाने अपेक्षित आहेत.