आरएसएसचा भाजपशी संघर्ष!
By Admin | Updated: December 3, 2015 01:44 IST2015-12-03T01:43:46+5:302015-12-03T01:44:04+5:30
पणजी : गोव्यात प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाच्या विषयावरून प्रथमच भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक

आरएसएसचा भाजपशी संघर्ष!
पणजी : गोव्यात प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाच्या विषयावरून प्रथमच भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक
संघ यांच्यातील संबंधांना तडे गेले
आहेत. भाजप व संघ नेत्यांच्या आतील वर्तुळात याबाबतची चर्चा सुरू असून पार्सेकर सरकार मात्र माध्यमप्रश्नी
आपली भूमिका बदलण्यास मुळीच तयार नाही, अशी माहिती मिळाली.
डायोसेझन संस्थेच्या ज्या १३२ इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना सरकारी अनुदान मिळते, त्यांना ते सुरूच राहील. प्रथम पर्रीकर सरकारने अनुदान सुरूच ठेवण्याचे ठरविले व आता पार्सेकर सरकारचेही धोरण तेच आहे. मुख्यमंत्री पार्सेकर यांनी यापूर्वी विधानसभेतही हे धोरण स्पष्ट केले आहे. अजून या धोरणात बदल झालेला नाही, असे दोघा मंत्र्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. २०१२च्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनीच राज्यभर शिक्षणाच्या माध्यमप्रश्नी काँग्रेस सरकारविरुद्ध आंदोलन चालविले. पर्रीकर सरकार अधिकारावर आल्यानंतर संघाने कळ सोसली होती; पण पार्सेकर सरकारही अनुदान सुरूच ठेवत असल्याने पुन्हा एकदा संघ नेत्यांनी दंड थोपटले आहेत. यापुढील टप्प्यात भारतीय भाषा सुरक्षा मंचचे आंदोलन वाढत जाणार आहे. तशी व्यूहरचना संघाने केली आहे.
दरम्यान, भाजपसोबत सत्तेत असलेल्या म.गो. पक्षाने भाषा सुरक्षा मंचच्या आंदोलनास आपला पाठिंबा जाहीर केला आहे. इंग्रजी शाळांना सरकारी अनुदान नको, ही आमची पूर्वीचीच भूमिका कायम असून आमचा पाठिंबा मंचाला आहे, असे ‘मगो’चे अध्यक्ष व मंत्री दीपक ढवळीकर म्हणाले.
(खास प्रतिनिधी)