लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ तसेच केपे व काणकोण आरोग्य केंद्रांमध्ये कर्मचारी भरती व इतर सुविधा महिनाभरात उपलब्ध केल्या जातील. याबाबत, काही त्रुटी माझ्या नजरेस आणून दिलेल्या आहेत. त्या दूर केल्या जातील' असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.
बुधवारी मुख्यमंत्री सावंत यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील आरोग्यसेवेचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक झाली. राज्यातील आरोग्यसेवेला बळकटी देण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, मंत्री माविन गुदिन्हो, दिगंबर कामत, रमेश तवडकर, सुभाष फळदेसाई यांसह मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, आरोग्य सचिव, आरोग्य सेवा संचालक आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, 'राज्य सरकार प्रत्येक नागरिकासाठी सुलभ, कार्यक्षम आणि दर्जेदार आरोग्यसेवा सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये पायाभूत सुविधा सुधारणे, गंभीर रिक्त पदे भरणे आणि आपत्कालीन आणि विशेष सेवा सुधारणे यावर लक्ष केंद्रित केले जात आहे.'
दरम्यान, या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री राणे म्हणाले की, 'विविध सरकारी रुग्णालयांमध्ये सेवा, कर्मचारी, उपकरणे, पायाभूत सुविधांची कमतरता याबाबत विश्लेषण होणार आहे. रुग्णालयांमध्ये आवश्यक सुविधा आणि सध्या उपलब्ध सुविधा तपासल्या जातील व त्यावर उपाययोजना आखण्याची प्रक्रिया सुरू होईल. डॉक्टर्स, परिचारिका, मल्टिटास्किंग कर्मचाऱ्यांची संख्या, तंत्रज्ञान या सर्व बाबींचा समावेश होईल. त्यावर आधारित रोडमॅप अर्थात कार्यान्वयन योजना तयार केली जाईल. पुढील बारा महिन्यांत त्याची अंमलबजावणी केली जाईल. या कामी केंद्राचाही सहभाग असेल.'
आरोग्यमंत्री राणे म्हणाले की, 'आम्ही इस्पितळे बांधली, परंतु तेथे रुग्णांना योग्य सुविधा मिळायला हव्यात. एमआरआय, सीटी स्कॅन यांसारख्या सुविधांची गरज आहे. डॉक्टरांनी बैठकीत काही उणिवा स्पष्ट केल्या. नंतर काही गोष्टी मंजूरही केल्या आहेत. राज्य सरकारच्या तिजोरीतून मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळणारच आहे. शिवाय, केंद्राकडूनही आर्थिक मदत घ्यावी लागेल. काही इस्पितळांमध्ये तंत्रज्ञ, कन्सल्टंट नेमावे लागतील.
सांगे उप-जिल्हा रुग्णालयाचे लवकरच उद्घाटन
सांगे येथे नवीन डायलिसिस युनिट स्थापन करणारआरोग्यसेवेत नव्या रुग्णवाहिकांचा समावेशवैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी वाहने, उपकरण तरतूदआपत्कालीन आणि ट्रॉमा सेंटर्सचे अपग्रेडेशनअतिरिक्त परिचारिका, एमटीएस, तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करणार
आरोग्य सेवेसंबंधीच्या उच्चस्तरीय बैठकीत राज्यातील सरकारी इस्पितळांमध्ये ज्या काही त्रुटी आहेत, त्यांचे विश्लेषण ३० दिवसांत करून सुधारणा घडवून आणण्यासाठी रोडमॅप तयार करण्याचा निर्णय झाला. रोडमॅपची पुढील बारा महिन्यांत अंमलबजावणी होईल. - विश्वजीत राणे, आरोग्यमंत्री
Web Summary : Goa government commits to improved healthcare. South Goa hospital and health centers in Quepem, Canacona will see staff recruitment and facility upgrades soon. A 12-month roadmap addresses hospital deficiencies with infrastructure upgrades, staffing, and equipment, supported by state and central funds. Sanguem sub-district hospital to open soon.
Web Summary : गोवा सरकार बेहतर स्वास्थ्य सेवा के लिए प्रतिबद्ध है। केपेम, कानाकोना में दक्षिण गोवा अस्पताल और स्वास्थ्य केंद्रों में जल्द ही कर्मचारियों की भर्ती और सुविधाओं का उन्नयन होगा। एक 12 महीने का रोडमैप राज्य और केंद्र सरकार के धन से समर्थित बुनियादी ढांचे के उन्नयन, कर्मचारियों और उपकरणों के साथ अस्पताल की कमियों को दूर करता है। सांगुएम उप-जिला अस्पताल जल्द ही खुलेगा।