नावशी येथे मरीना प्रकल्प उभारण्याच्या पुन्हा हालचाली; पर्यावरणाची हानी करुन प्रकल्प नको, कॉंग्रेसची मागणी
By पूजा प्रभूगावकर | Updated: October 20, 2023 14:12 IST2023-10-20T14:12:00+5:302023-10-20T14:12:22+5:30
सदर प्रकल्प नावशी येथे होणार नाही असे राज्य सरकारने न्यायालयात नमूद केले होते.

नावशी येथे मरीना प्रकल्प उभारण्याच्या पुन्हा हालचाली; पर्यावरणाची हानी करुन प्रकल्प नको, कॉंग्रेसची मागणी
पणजी: नावशी येथे प्रस्तावित मरीना प्रकल्प उभारण्याच्या पुन्हा एकदा हालचाली सुरु झाल्या आहेत. या प्रकल्पामुळे पारंपरिक मच्छीमारांच्या पोटावर पाय देण्याचा प्रकार असून सदर प्रकल्पाला कठोर विरोध केला जाईल असा इशारा कॉंग्रेसचे सरचिटणीस कॅप्टन व्हिरियातो फर्नांडिस यांनी पत्रकार परिषदेत दिला.
सदर प्रकल्प नावशी येथे होणार नाही असे राज्य सरकारने न्यायालयात नमूद केले होते. मग केंद्र सरकारने या प्रकल्पाला पर्यावरणी मंजुरी कशी जारी केली. पर्यटनाला चालना देण्याच्या नावाखाली पर्यावरणाची हानी नको अशी मागणीही त्यांनी केली.
फर्नांडिस म्हणाले, की नावशी किनारा हा जैवविविधततेने नटकेला असून त्यात विविध प्रजातीवी मासळी आढळून येते. एनआयओ तसेच आयसीएआरचा तसा अहवाल आहे. या किनाऱ्यावर अनेक पारंपरिक मच्छीमार अनेक वर्षापासून मच्छीमारी व्यवसाय करीत आहेत. मात्र या प्रस्तावित मरीना प्रकल्पामुळे तेथे पर्यटकांना फिरण्यासाठी बोटी व अन्य सुविधा असते. सदर प्रकल्प हा समुद्रात १ लाख चौरस मीटर तर जमिनीवर ५० चौर स मीटर जागेत होणार आहे. यावरुनच पर्यावरणाची किती मोठी हानी होणार आहे. तसेच पारंपरिक मच्छीमारांच्या व्यवसायावर परिणाम होणार असल्याचा आरोप त्यांनी केला.