शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

गोव्यात दहावीचा निकाल उद्या, सकाळी 11.30 वाजता होणार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 7:40 PM

गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळाने एप्रिलमध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या मंगळवारी २१ रोजी सकाळी ११.३0 वाजता जाहीर केला जाईल.

पणजी : गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळाने एप्रिलमध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्यामंगळवारी २१ रोजी सकाळी ११.३0 वाजता जाहीर केला जाईल. २३ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी १.३0 या वेळेत विद्यालयांना गुणपत्रिकांचे वितरण केले जाईल.गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळाचे चेअरमन रामकृष्ण सामंत म्हणाले की, निकालाची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. पर्वरी येथे शिक्षण संचालनालयाच्या इमारतीत सकाळी ११.३0 वाजता निकाल जाहीर होईल आणि लगेच तो मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध केला जाईल. २८ केंद्रांवर १९,३४३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. विशेष गरजा असलेल्या २८४ परीक्षार्थींनीही या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.मुरगाव तालुक्यातील विद्यालयांमधील परीक्षार्थींच्या गुणपत्रिका सेंट अ‍ॅण्ड्रयु स्कूलमध्ये तसेच काणकोण व सासष्टी तालुक्यातील विद्यालयांच्या गुणपत्रिका मडगाव येथील लॉयोला हायस्कूलमध्ये, केपे आणि सांगे तालुक्यातील विद्यालयांच्या गुणपत्रिका कुडचडे येथील एसईएस हायस्कूलमध्ये, फोंडा आणि धारबांदोडा तालुक्यातील विद्यालयांच्या गुणपत्रिका फोंड्यातील ए. जे. डी आल्मेदा हायस्कूलमध्ये, तिसवाडीतील विद्यालयांच्या गुणपत्रिका प्रोग्रेस हायस्कूलमध्ये, बार्देस आणि पेडणे तालुक्यातील विद्यालयांच्या गुणपत्रिका म्हापशातील ज्ञानप्रसारक विद्यालयात तर डिचोली आणि सत्तरी तालुक्यातील विद्यालयांच्या गुणपत्रिका साखळीच्या प्रोग्रेस हायस्कूलमध्ये वितरीत केल्या जातील.