सावईवेरे ते पणजी मार्गावरील बंद असलेली कदंब बस पूर्ववत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 15:24 IST2023-10-02T15:23:10+5:302023-10-02T15:24:59+5:30
त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला होता.

सावईवेरे ते पणजी मार्गावरील बंद असलेली कदंब बस पूर्ववत
लोकमत न्यूज नेटवर्क, सावईवेरे : सावईवेरे ते पणजी मार्गावरील बंद असलेली कदंब बस कालपासून पूर्ववत सुरू केल्याने या भागातील विद्यार्थी तसेच कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे.
सावईवेरे माशेल पणजी या मार्गावरील कदंब बसची सकाळी पावणेआठची फेरी तसेच अन्य फेऱ्या गेल्या सुमारे २० दिवसांपासून बंदच होत्या. सकाळची पावणेआठची फेरी बंद असल्याने विशेषत: विद्यार्थी तसेच कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे खूपच हाल झाले. त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला होता.
बस बंद असल्यामुळे सावईवेरे येथील काही प्रवाशांनी कदंबचे व्यवस्थापक संजय घाटे तसेच कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांच्याशी संपर्क साधून सदर बस पूर्ववत चालू करण्याची विनंती केली होती. स्थानिक आमदारांनीही यात विशेष लक्ष घालून बस पूर्ववत चालू करण्यासाठी प्रयत्न केले. बस पूर्ववत सुरू झाल्याने प्रवाशांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. कदंब बसच्या या फेरीमुळे विद्यार्थी व कामगारांची चांगली सोय होत असते. खासगी बस सेवेऐवजी कदंबची बस सेवा ही विश्वासार्ह मानली जाते. त्यामुळे ही सेवा बेभरवशाची ठरू नये, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.