राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी कवळेवासीय सज्ज

By आप्पा बुवा | Updated: August 23, 2023 16:13 IST2023-08-23T16:11:23+5:302023-08-23T16:13:07+5:30

गोव्याच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु कवळे येथील शांतादुर्गा मंदिराला भेट देणार असून त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.

Residents of Kavale are ready to meet President Draupadi Murmu | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी कवळेवासीय सज्ज

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी कवळेवासीय सज्ज

फोंडा - गोव्याच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु कवळे येथील शांतादुर्गा मंदिराला भेट देणार असून त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.

पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार साडेअकरा ते बाराच्या दरम्यान राष्ट्रपती  मंदिर ठिकाणी येणार असून त्या देवी श्री शांतादुर्गाचे दर्शन यावेळी घेणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी प्रशासन व मंदिर समितीने जय्यत तयारी सुरू केली आहे.

बुधवारी वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी बुधवारी मंदिर परिसरात चाललेल्या तयारीचा आढावा घेतला व अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना सुद्धा केल्या. यावेळी माजी सरपंच राजेश कवळेकर, फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक तुषार लोटलीकर, मंदिर समितीचे पदाधिकारी, वीज खात्याचे कार्यकारी अभियंता सुदन कुंकळीकर व इतर प्रशासनिक अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Residents of Kavale are ready to meet President Draupadi Murmu