शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

पाकला चोख प्रत्युत्तर देऊ

By admin | Updated: December 8, 2014 02:00 IST

संरक्षणमंत्र्यांचा इशारा : काश्मीरमधील हल्ला पाक पुरस्कृतच

पणजी : काश्मीरमध्ये लष्कराच्या छावणीवर पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेला हल्ला हा अत्यंत गांभीर्याने घेतला आहे. हा हल्ला पाकिस्तान पुरस्कृत होता हे सिद्ध झाले आहे. या हल्ल्यास चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी येथे दिला. पर्रीकर हे गोव्यात सुरू असलेल्या सेंट फ्रान्सिस झेवियर शवदर्शन सोहळ्याची व्यवस्था पाहण्यासाठी जुने गोवा येथे गेले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, काश्मीरमध्ये लष्करी छावणीवर हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांकडे सापडलेली शस्त्रास्त्रे ही पाकिस्तान बनावटीची होती. त्यामुळे हल्लेखोर पाकिस्तानी होते, हे सिद्ध झाले. ही घटना सरकारने अत्यंत गांभीर्याने घेतली आहे. या हल्ल्याचे प्रत्युत्तर पाकिस्तानला मिळेल. काय केले जाईल याबद्दल आम्ही बोलणार नाही; परंतु जे काही करायचे ते केले जाईल, असे ते म्हणाले. काश्मीरमधील हिंसक घटनांनंतर देशाचे लष्कर प्रमुख तीन वेळा काश्मीरमध्ये जाऊन आले. यावरून सततचे हल्ले किती गांभीर्याने घेतले जातात आणि त्याबद्दल आमचे इरादेही स्पष्ट आहेत, असेही ते म्हणाले. काश्मीरमधील निवडणुकांनंतर अतिरेकी हल्ले वाढले आहेत याचे कारण सांगताना ते म्हणाले, निवडणुकीत उत्स्फूर्त प्रतिसादामुळे काश्मीरमध्ये लोकशाही अस्तित्वात असल्याचे सत्य पुन्हा एकदा जगासमोर आले. ७२ टक्के मतदान नोंद झाल्यामुळे काश्मीरमधील लोक मोठ्या प्रमाणावर लोकशाही प्रक्रियेत सहभागी होतात याची दखल जागतिक पातळीवर घेतलीआणि हेच नेमके पाकला झोंबले. त्यामुळेच वैफल्यग्रस्त होऊन हल्ले चालविले आहेत. (प्रतिनिधी)