स्मार्ट सिटीसाठी राजधानी पुन्हा खोदली; वाहतूक कोंडी अन् धुरळ्याचा त्रास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 15:09 IST2023-10-14T15:09:07+5:302023-10-14T15:09:41+5:30
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या पाश्वभुमीवर रस्ते खड्डेमय राज्यात आता राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरु होणार आहे

स्मार्ट सिटीसाठी राजधानी पुन्हा खोदली; वाहतूक कोंडी अन् धुरळ्याचा त्रास
नारायण गावस
पणजी : पावसामुळे गेले तीन महिने बंद असलेली पणजीतील स्मार्ट सिटीची कामे पुन्हा सुरु केली आहेत. यामुळे पणजीतील रस्ते पाईपलाईन घालण्यासाठी खोदण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात आता पुन्हा वाहतूक काेंडी तसेच धुरळाचा त्रास सुरु झाला आहे. गेल्या उन्हाळ्यात अशाच प्रकारे पणजीतील ठिकठिकाणी रस्ते खोदल्याने लोकांना त्रास सहन करावा लागला हाेता.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या पाश्वभुमीवर रस्ते खड्डेमय राज्यात आता राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरु होणार आहे. यात पंतप्रधान नरेंद्र माेदी प्रमाणे महनीय व्यक्ती गोव्यात येणार आहेत. त्यामुळे पणजी राजधानी असल्याने पणजीत अनेक महनीय व्यक्ती येत असतात. पण पणजीतील रस्ते खाेदायला सुरु केल्याने याचा फटका हा सर्वाना बसणार आहे. गेल्या वेळी जी २० मुळे तात्पूरते रस्त्यांची दुरुस्ती केली होती. आता हे खाेदकाम आणखी किती दिवस चालणार हे अजून लोकांना माहित नाही गेली दोन वर्षापासून पणजीत खोदकाम केले जात आहे.
पर्यटन हंगाम सुरु झाल्याने फटका
आता पर्यटन हंगाम सुरु झाला आहे. शहरात पर्यटक आले आहेत. पणजीतील चर्च चौक, कॅसिनो. तसेच इतर शहरातील भागात पर्यटकांची गर्दी असते. पण राजधानीतील बहुतांश रस्त्यावर स्मार्ट सिटीचे ाकाम सुरु केल्याने वाहतूक कोंडी सुरु केली आहे. त्यामुळे आता वाहनचालकांना व पर्यटकांना याचा त्रास सहन करावा लागणार. त्यामुळे पणजीवासियांनी नाराजी व्यक्त केली आहे.
काम हाेतात संथ गतीने
स्मार्ट सिटीचे पणजीतील कामे ही टप्प्याने केली जात नाही सर्व रस्ते एकदम खाेदले जातात. त्यामुळे सर्वांना याच फटका बसतो. एक टप्पा पूर्ण झाल्यावर दुसऱ्या टप्प्याचे काम सुरु केले जात नाही. आता रायबंदर भागातही स्मार्ट सिटीचे काम सुरु झाले आहे. पण या लोकांनी अगोदरच या अधिकाऱ्यांना कामात हलगर्जीपणा न करण्याचा इशार ादिला आहे.
पणजीतील प्रलंबीत असलेली स्मार्ट सिटीची कामे लवकर पुर्ण करण्याचा हेतू आहे. या आर्थिक वर्षात शहरातील सर्व स्मार्ट सिटीचे कामे पूर्ण होणार आहे. वाहन धारकांना तसेच लाेकांना याच त्रास होणार नाही याची ीदखल घेतली जाणार तसेच रऱ्त्यावर धुर पसरु नये यासाठी पाण्याची फवारणी केली जाणार.
-संजित रॉड्रिग्ज
- मुख्य कार्यकारी अधिकारी- स्मार्ट सिटी