नातेवाईकानेच केला बलात्कार: गुन्हा नाेंद: संशयित फरार

By सूरज.नाईकपवार | Updated: July 4, 2023 21:47 IST2023-07-04T21:47:11+5:302023-07-04T21:47:19+5:30

मडगाव : नात्याच्या संबधालाच काळीमा फासणारी एक  घटना  गोव्यातील सासष्टी येथील मायणा कुडतरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, नातेवाईकानेच ...

Raped by a relative: Crime Naend: Suspect absconding | नातेवाईकानेच केला बलात्कार: गुन्हा नाेंद: संशयित फरार

नातेवाईकानेच केला बलात्कार: गुन्हा नाेंद: संशयित फरार

मडगाव : नात्याच्या संबधालाच काळीमा फासणारी एक  घटना  गोव्यातील सासष्टी येथील मायणा कुडतरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, नातेवाईकानेच एका २५ वर्षीय युवतीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पिडित युवतीने पोलिसांत या प्रकरणी तक्रार नोंद केली आहे.

नाबासिंग सरकार ( २६) असे संशयिताचे नाव असून, सदया तो फरार आहे. पोलिस सदया त्याचा सदया शोध घेत आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वर्षदा नाईक देसाई पुढील तपास करीत आहेत. संशयिताने पिडिताला धमकी देउन तिच्यावर बलात्कार केला होता. ९ जून ते २० जून दरम्यान त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते.

झालेल्या प्रकरणांची वाच्यता कुठेही करु नये असेही धमकविले होते. संंशयित पिडिताकडे राहायला आला होता. तो मूळ पश्चिम बंगाल राज्यातील आहे. भादंसंच्या ३७६, ३६६ व ५०६ कलमाखाली पोलिसांनी संशयितावर गुन्हा नोंद केला आहे.

Web Title: Raped by a relative: Crime Naend: Suspect absconding