मंगळुरुमध्ये बलात्कार करून फरार; संशयित मडगावात जेरबंद

By सूरज.नाईकपवार | Updated: August 17, 2023 10:38 IST2023-08-17T10:19:14+5:302023-08-17T10:38:29+5:30

संशयित आपल्या मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, तत्पूर्वीच कोकण रेल्वे पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

rape in Mangaluru and absconding; Suspect detained in Madgaon, goa | मंगळुरुमध्ये बलात्कार करून फरार; संशयित मडगावात जेरबंद

मंगळुरुमध्ये बलात्कार करून फरार; संशयित मडगावात जेरबंद

मडगाव : शेजारच्या  कर्नाटकातील मंगळुरू येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून पसार झालेला नराधम काल, बुधवारी मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकावर सापडला. गस्तीवरील पोलिसांनी त्याला जेरबंद केले.

अब्दुल हमिल (३७) असे संशयिताचे नाव असून, तो मूळ बिहार येथील आहे. त्याच्याविरोधात मंगळुरू महिला पोलिस ठाण्यात भादंसंच्या ३७६ व बाल सरंक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंद आहे. पाप कर्म केल्यानतंर त्याची वाच्यता झाल्यानंतर संशयित पसार झाला होता. मंगळुरू पोलिसांनी संशयिताबद्दल सचित्र माहिती अन्य राज्यातील पोलिसांना कळविली होती. संशयित गुन्हा करून गोव्यात पळाल्याची माहिती तेथील पोलिसांना मिळाली होती. गोवा पोलिसांना नंतर कळविण्यात आले होते. काल, बुधवारी दुपारी मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर संशयित आला असता, तेथील गस्तीवरील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले नंतर ही माहिती मंगळुरू पोलिसांना कळविण्यात आली. मंंगळुरू पोलिसांनी रात्री येऊन संशयिताला आपल्या ताब्यात घेतले.

संशयित आपल्या मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, तत्पूर्वीच कोकण रेल्वे पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. तो मंगळुरू येथून मंगळुरू पॅसेंजर रेल्वेतून मडगावात आला होता. ११ ऑगस्ट रोजी त्याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला होता. तो सध्या मंगळुरू सिटी येथे वास्तव करून होता.

Web Title: rape in Mangaluru and absconding; Suspect detained in Madgaon, goa