राणेंचे खंदे समर्थक प्रकाश गावकर काँग्रेसमधून निलंबित
By Admin | Updated: August 27, 2014 01:31 IST2014-08-27T01:28:06+5:302014-08-27T01:31:04+5:30
पणजी : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस यांनी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम चालूच ठेवताना पर्ये गट समितीचे अध्यक्ष प्रकाश गावकर यांना

राणेंचे खंदे समर्थक प्रकाश गावकर काँग्रेसमधून निलंबित
पणजी : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस यांनी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम चालूच ठेवताना पर्ये गट समितीचे अध्यक्ष प्रकाश गावकर यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून निलंबित केले आहे. गावकर हे विरोधी पक्षनेते तथा पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे यांचे खंदे समर्थक आहेत.
जॉन फर्नांडिस यांना पर्ये मतदारसंघात पाय ठेवू न देण्याचा इशारा गावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गट समितीच्या बैठकीत देण्यात आला होता. स्थानिक आमदार या बैठकीस उपस्थित होते. त्यांनी तसे करू नये, अशी सूचना केली असतानाही गावकर यांनी हा निर्णय घेतला. याची प्रदेशाध्यक्षांनी गंभीर दखल घेतली. २६ जुलै रोजी त्यासंबंधीचे वृत्त वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची दखल घेऊन त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवून प्रदेश समितीने महिनाभरात स्पष्टीकरण मागितले होते. त्याची मुदत मंगळवारी संपली. त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. त्याच्या या बेजबाबदारपणाची दखल घेऊन पक्षातून त्याला निलंबित केले असून चौकशी चालू करण्यात आली आहे.
(प्रतिनिधी)