राणे पिता-पुत्रांची ‘नार्को टेस्ट’ करा

By Admin | Updated: June 30, 2014 02:11 IST2014-06-30T02:06:32+5:302014-06-30T02:11:21+5:30

भालचंद्र नाईक : १० कोटी लाच मागितल्याच्या आरोपावर ठाम

Rane's father-son's 'Narco Test' | राणे पिता-पुत्रांची ‘नार्को टेस्ट’ करा

राणे पिता-पुत्रांची ‘नार्को टेस्ट’ करा

पणजी : काँग्रसचे आमदार विश्वजीत राणे यांनी दहा कोटी रुपये लाच मागितल्याच्या आरोपावर खाण लिजधारक दहेजा मिनरल्स कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक भालचंद्र नाईक हे ठाम आहेत. विरोधी पक्षनेत्यांनी अब्रु नुकसानीचा खटला घालावाच, असे आव्हान त्यांनी दिले आहे. राणे पिता-पुत्राची या प्रकरणात नार्को टेस्ट घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
भ्रष्ट माणूस मागे पुरावा ठेवत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याप्रमाणे परिस्थितीजन्य पुरावेही पुरेसे ठरू शकतात, असे नाईक यांचे म्हणणे आहे. वरील प्रकरणात आपली फसवणूक झालेली असून आपली मानसिक छळवणूकही झालेली आहे. उलट राणे यांनी या प्रकरणात आपल्यालाच वेडे ठरविले असल्याने त्याच वेदना आपल्या मनात असल्याचे नाईक यांनी म्हटले आहे. राणे यांनी अब्रुनुकसानीचा खटला न घातल्यास आपण भ्रष्टाचारविरोधी खटला त्यांच्यावर घालीन, असा इशाराही नाईक यांनी दिला आहे. आपण वस्तुस्थिती उजेडात आणली असताना आपल्याला वेडे ठरविले जाते त्याबद्दलही खटला दाखल करण्याचा इशारा नाईक यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या प्रकरणी चौकशी करण्याची तयारी दाखविल्याने नाईक यांनी त्याचे स्वागत केले आहे. याशिवाय आपल्याकडे सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या एसआयटीकडे तसेच एम. बी. शहा आयोगाकडे जाण्याचाही पर्याय खुला असल्याचे त्यांनी या संदर्भातील पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Rane's father-son's 'Narco Test'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.