शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले; 350 टक्के शुल्काची धमकी देऊन भारत-पाक युद्ध थांबवल्याचा केला दावा
2
ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळली; ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसांनंतर अपघात झाल्याचे समजले
3
'गुंडांना जामीन, नेत्यांना जमीन', व्हिडीओ शेअर करत रोहित पवारांचा सीएम देवेंद्र फडणवीस यांना सवाल
4
शाह-शिंदेंची दिल्लीत भेट, चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “महायुती...”
5
'पीएम किसान' योजनेचे फिल्टर थांबेनात; २१ व्या हप्त्यासाठी ६.१० लाख लाभार्थी झाले बाद
6
'ही' मोठी बँक भारतातील व्यवसाय बंद करण्याच्या विचारात, खरेदीसाठी दोन दिग्गज बँका शर्यतीत
7
ते जीव वाचवण्यासाठी तडफडले पण कुणाला कळलंही नाही; थंडी लागू नये म्हणून शेकोटीसाठी कोळसा घेऊन आले अन्…
8
"कोणीतरी दिल्लीला गेलंय, बाबा मारलं म्हणून रडत"; अमित शाहांच्या भेटीवरुन उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
9
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टरने अडीच वर्षीय मुलाच्या डोळ्याजवळील जखमेवर लावलं फेविक्विक
10
"महाराष्ट्रातील घडामोडींवर माझं लक्ष, तुमचा…’’, तक्रार घेऊन आलेल्या एकनाथ  शिंदेनां अमित शाहांचं मोठं आश्वासन
11
देशाचा 'नंबर १' ब्रँड TCS नव्हे तर HDFC बँक! ब्रँडझेड रिपोर्टमध्ये मोठा उलटाफेर; 'या' कारणामुळे सर्वात मौल्यवान!
12
ऐतिहासिक! नितीश कुमार यांनी 10 व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
13
Pharmacy Colleges: फार्मसी कॉलेजांना 'नो ॲडमिशन'! प्रवेशाविना १५ हजारांहून अधिक जागा रिकाम्या
14
राज्यपालांवर वेळेची मर्यादा घालता येणार नाही; राष्ट्रपतींच्या 'त्या' प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
15
अल फलाह युनिव्हर्सिटीचे चेअरमन जावेद सिद्दीकी यांच्या अडचणी वाढल्या; आता घरावर चालणार बुलडोझर 
16
“डिसेंबर अखेरपर्यंत महामेट्रो मीरा-भाईंदरकरांच्या सेवेत येणार”: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
17
Mumbai: कापूर पडलेल्या तेलात तळलेला समोसा खाल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा, शाळांना अन्न सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे निर्देश!
18
एक 'अशी' शूटर बनली नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये मंत्री; जिनं भारताबाहेर कायम ठेवलाय दबदबा
19
फातिमा सना शेखने फेमिनझमवर केलं भाष्य; म्हणाली, "पुरुषांना कमी दाखवणं म्हणजे..."
20
भारतीय लष्कराला बूस्ट! अमेरिकेने जेव्हलिन क्षेपणास्त्र विक्रीला दिली मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

रामा काणकोणकर यांचा जबाब नोंदवला; तपासाला गती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 12:35 IST

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी शुक्रवारी गोमेकॉत येथे जाऊन उपचार घेत असलेल्या रामा यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : करंजाळे येथे प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेले सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांचा शुक्रवारी पणजी पोलिसांनी गोमेकॉत जबाब नोंदवला. पोलिसांनी हल्ल्याच्या दिवशीचा घटनाक्रम रामा यांच्याकडून जाणून घेतला. यावेळी रामा यांनी 'मिंगेल आरावजो हा आपल्या पाळतीवर होता,' असे सांगितले. या जबाबाची पोलिस आता पडताळणी करीत आहेत. 

जबाब नोंद झाल्याने हल्ला प्रकरणाच्या तपासाला गती मिळणार आहे. सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर १७ सप्टेंबर रोजी करंजाळे येथे हल्ला झाला. त्यानंतर, रामा यांच्यावर गेले पंधरा सोळा दिवसांपासून गोमेकॉत उपचार सुरू आहेत.

विश्वजीत यांनी केली रामाची विचारपूस

दरम्यान, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी शुक्रवारी गोमेकॉत येथे जाऊन उपचार घेत असलेल्या रामा यांच्या तब्येतीची विचारपूस केली. 'सरकार काणकोणकर यांना सर्वोत्तम दर्जाचे उपचार देत आहे. याविषयी देखरेखीसाठी डॉक्टरांची समिती स्थापन केली आहे. रामा यांच्या डिस्चार्जबद्दल अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. जोपर्यंत त्यांची प्रकृती ठीक असल्याची कुटुंबाची खात्री पटत नाही, तोपर्यंत त्यांना डिस्चार्ज दिला जाणार नाही, असे मंत्री राणे यांनी सांगितले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश पाटील उपस्थित होते.

रामा यांनी काय सांगितले?

संशयित मिंगेल आरावजो हा आपला पाठलाग करायचा. ज्यावेळी संशयितांनी आपल्याला गाठून मारहाण केली. त्यांनी आपल्याला जातीवाचक उल्लेख करून, शिवीगाळ केल्याचे जबाबात नमूद केल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी गोमेकॉत काणकोणकर यांची भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली. जोपर्यंत त्यांची प्रकृती ठीक असल्याची कुटुंबाची खात्री पटत नाही, तोपर्यंत डिस्चार्ज दिला जाणार नाही, असे राणे यांनी सांगितले.

मास्टरमाइंडचा शोध

काणकोणकर यांच्यावरील हल्लाप्रकरणी पणजी पोलिसांनी सराईत गुन्हेगार जेनिटो कार्दोज याच्यासह सात जणांना अटक केली आहे. सध्या सर्व संशयित न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, अजूनही या हल्ल्यामागील मास्टरमाइंड कोण याचा उलगडा झाला नसल्याचे सामाजिक आहे. कार्यकर्त्यांचे म्हणणेगेल्या काही दिवसांपासून त्यांचा जबाब घेण्यासाठी पोलिस प्रयत्नशील होते. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे जबाब नोंदवणे शक्य झाले नव्हते. अखेर हल्ल्यानंतर जवळपास १५ दिवसांनंतर, शुक्रवारी, त्यांचा जबाब नोंदवला गेला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता आणखी कोणावर कारवाई केली जाईल, याकडे लक्ष लागले आहे. हल्ल्यामागील कारणांचा उलगडा होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Statement Recorded; Investigation Intensifies in Attack on Rama Kanconkar

Web Summary : Rama Kanconkar's statement was recorded, revealing he was being followed. Health Minister Viswajit Rane inquired about Kanconkar's health. Seven arrested in connection with the attack; mastermind search ongoing. Investigation gains momentum.
टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण