रेल्वेत चोरट्यांचा उच्छाद; पाच जखमी
By Admin | Updated: January 21, 2015 02:09 IST2015-01-21T02:06:18+5:302015-01-21T02:09:06+5:30
गोव्याच्या हद्दीत घटना : तिघा चोरट्यांना पकडले

रेल्वेत चोरट्यांचा उच्छाद; पाच जखमी
कुडाळ : मंगळुरूहून मुंबईकडे जाणाऱ्या त्रिवेंद्रम-वेरावल रेल्वेत पेडणेच्या दरम्यान मंगळवारी चोरट्यांनी धुमाकूळ घालताना प्रवाशांना वेठीस धरले. रेल्वेतील पाचजणांवर चाकूचे वार करून सुमारे ४७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल लुटून पळून जात असताना चार चोरट्यांपैकी तिघांना प्रवासी व झाराप ग्रामस्थांच्या मदतीमुळे पकडण्यात यश आले. मात्र, एक चोर पळून जाण्यात यशस्वी ठरला. त्याचा कुडाळ पोलीस शोध घेत आहेत. चोरांचे कनेक्शन मडगाव येथे असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
मंगळुरू येथून पहाटे पाच वाजता सुटणारी ही रेल्वे दुपारी १.१५ वाजता झाराप येथे पोहोचली. झाराप स्थानकावर क्रॉसिंगसाठी ती थांबविण्यात आली होती. या वेळी इंजिनकडून पहिल्या डब्यातून ‘चोर चोर... पकडा पकडा...’ असा आरडाओरडा ऐकू आला. जनरल डब्यातून चार चोर प्रवाशांकडील पैसे आणि इतर साहित्य लुटून पळण्याच्या प्रयत्नात होते. काहीजणांनी त्या चौघांपैकी एकाला पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेची माहिती कुडाळ पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक सतीश निकम
तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पळालेल्या तिघांपैकी एका चोरास ग्रामस्थांच्या मदतीने नजीकच्या जंगल भागातून जेरबंद
केले.