राजू नायक यांच्या पुस्तकांचे शनिवारी पणजीत प्रकाशन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 06:21 AM2019-05-09T06:21:36+5:302019-05-09T06:21:51+5:30

पणजी : लोकमतचे संपादक राजू नायक यांनी लिहिलेल्या तीन पुस्तकांचे प्रकाशन शनिवारी ११ रोजी येथील मॅकिनीझ पॅलेस सभागृहात सायं. ...

Raju Nayak's books on Saturday, Panjit Publications | राजू नायक यांच्या पुस्तकांचे शनिवारी पणजीत प्रकाशन

राजू नायक यांच्या पुस्तकांचे शनिवारी पणजीत प्रकाशन

Next

पणजी : लोकमतचे संपादक राजू नायक यांनी लिहिलेल्या तीन पुस्तकांचे प्रकाशन शनिवारी ११ रोजी येथील मॅकिनीझ पॅलेस सभागृहात सायं. साडेपाचला होणार आहे. या प्रकाशन सोहळ्यास ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्यासोबत लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा आणि चित्रकार सुभाष अवचट उपस्थित राहणार आहेत.
‘जहाल आणि जळजळीत’, ‘हिरव्या बोलीचे शब्द’ आणि ‘ओस्सय’ ही तीन पुस्तके प्रकाशित होणार आहेत. ‘जहाल आणि जळजळीत’ मधून अलीकडील राजकीय घटनाक्रमांची चिकित्सक मिमांसा केली आहे. ‘हिरव्या बोलीचे शब्द’मध्ये पर्यावरणीय सजगतेसाठी केलेल्या लेखनकामाठीचा समावेश आहे. ‘ओस्सय’ हे त्यांचे तिसरे पुस्तक राज्यातील सांस्कृतिक आसमंतावर भाष्य करणाऱ्या लेखांचा संग्रह आहे.

Web Title: Raju Nayak's books on Saturday, Panjit Publications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app
टॅग्स :goaगोवा