शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

पाटणेकर विजयी, राणे पराभूत, चर्चिल अनुपस्थित, ढवळीकरांचे मत काँग्रेसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 16:47 IST

सभापतींच्या निवडीसाठी एक दिवसाचे विधानसभा अधिवेशन मंगळवारी बोलविण्यात आले होते.

 

पणजी : विधानसभेच्या सभापतीपदासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीवेळी अपेक्षेप्रमाणे डिचोलीचे भाजप आमदार राजेश पाटणेकर हे जिंकले. पाटणेकर यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रतापसिंग राणे यांचा 22 विरुद्ध 16 मतांच्या फरकाने पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आमदार सभागृहात आलेच नाही तर मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी प्रथमच सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला मत दिले.

सभापतींच्या निवडीसाठी एक दिवसाचे विधानसभा अधिवेशन मंगळवारी बोलविण्यात आले होते. निवड प्रक्रियेवेळी कार्यकारी सभापती या नात्याने उपसभापती मायकल लोबो यांनी सभापतींचे स्थान भुषविले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीचे उमेदवार म्हणून पाटणेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. विरोधकांचे उमेदवार म्हणून पर्येचे आमदार राणे यांनी उमेदवारी सादर केली होती. जे भाजप उमेदवारासाठी ठरावाच्या बाजूने आहेत, त्यांनी उभे राहून आपला पाठिंबा दाखवून द्यावा, असे सभापती लोबो यांनी सांगितले. त्यावेळी भाजपच्या आमदारांसह, गोवा फॉरवर्डचे आमदार व अपक्ष तीन आमदार उभे राहिले.

फक्त कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर यांना उभे न राहता जागेवर बसूनच हात वर करावा अशी मुभा सभापतींनी दिली होती. त्यानुसार मडकईकर यांनी पाटणेकर यांना पाठिंबा देताना हात वर केला. मडकईकर हे अजुनही खूप हळू चालतात. ते आले व त्यांनी सभागृहात दाराच्या बाजूलाच असलेल्या खुर्चीवर जागा घेतली. ही खुर्ची वास्तविक म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांच्यासाठी होती. जोशुआ यांना उठविले गेले, दुसरी खुर्ची म्हणजे मडकईकर पूर्वी जिथे बसायचे ती खुर्ची दिली गेली.

पाटणेकर यांना बावीस मते मिळाल्याचे लोबो यांनी जाहीर केले. सत्ताधारी आघाडीकडे तेवीस आमदारांचे संख्याबळ असले तरी, लोबो हे सभापती या नात्याने मत देऊ शकले नाहीत. राणे यांच्या उमेदवारीचा ठराव मतदानाला टाकला गेला तेव्हा सोळा आमदार उभे राहिले. काँग्रेसचे पंधरा व मगोपचा एक असे मिळून सोळा मते राणे यांना प्राप्त झाली. लोबो यांनी पाटणेकर यांना नवे सभापती म्हणून जाहीर केले. मुख्यमंत्री सावंत व विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी हात देऊन पाटणेकर यांना मोठ्या सन्मानाने सभापतींच्या खुर्चीवर बसवले. मुख्यमंत्र्यांसह कवळेकर, राणे, माविन गुदिन्हो, बाबू आजगावकर, सुदिन ढवळीकर आदींनी पाटणेकर यांचे अभिनंदन करणारी भाषणे केली.

डिचोलीचा गौरव : सावंत डिचोली तालुक्यातील सर्व तिन्ही मतदारसंघांच्या आमदारांना सभापती होण्याचा मान मिळाला आहे. पाटणेकर हे गोड बोलणारे आमदार आहेत. त्यांनी सर्वांना समान न्याय द्यावा. यापूर्वी मयेचे अनंत शेट सभापती होते. मग मी साखळीचा आमदार या नात्याने सभापती झालो व आता डिचोलीचे आमदार सभापती झाले ही गौरवास्पद गोष्ट आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले व त्यांनी पाटणेकर यांचे अभिनंदन केले. कवळेकर यांनीही पाटणेकर यांचे अभिनंदन केले. आम्ही सभापतीपदाची निवडणूक खूप गंभीरपणे घेतली व त्यामुळेच राणे यांना रिंगणात उतरविले होते. आम्हाला या निवडणुकीचे महत्त्व ठाऊक होते. सभापतींनी सर्व सदस्यांना समान न्याय द्यावा, अशी अपेक्षा कवळेकर यांनी व्यक्त केली.

अपात्रता याचिका निकाली काढीन आपण सर्वाना न्याय देईन. आपण पूर्णपणे निपक्षपाती वागण्याचा प्रयत्न करीन. आपल्याला सभापतींचा सन्मान प्राप्त झाल्याविषयी खूप आनंद वाटतो, असे पाटणेकर म्हणाले. तसेच यावेळी आपल्याला स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांची खूप आठवण होते. सभागृहात पर्रीकर यांनी खूप मोठे योगदान दिलेले आहे. ते विरोधकांच्या प्रश्नांना अभ्यासपूर्ण पद्धतीने उत्तरे द्यायचे. त्यासाठी योग्य आकडेवारी वगैरे सादर करायचे. त्यांची ती स्टाईल विधिमंडळ कामकाजाची मजा वाढवत असे, असे पाटणेकर म्हणाले. विधानसभेचे कामकाज संपल्यानंतर पाटणेकर यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. आपल्याकडे काही आमदारांविरुद्ध ज्या अपात्रता याचिका आहेत, त्या याचिकांचा आपण अभ्यास करीन. आपण संबंधित अधिकारी व अन्य घटकांशी चर्चा करीन आणि मगच या याचिकांवर शक्य तेवढय़ा लवकर निवाडा देऊन त्या निकालात काढीन, असे पाटणेकर यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवा