पावसाने झोडपले २४ तासांत मुसळधारेची शक्यता

By Admin | Updated: July 31, 2014 02:25 IST2014-07-31T02:23:21+5:302014-07-31T02:25:20+5:30

पणजी : बुधवारी दिवसभर जोरदार पाऊस पडल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती होती. दिवसभरात अडीच ते ३ इंच पावसाची नोंद झाली आहे.

Rains likely to rattle within 24 hours | पावसाने झोडपले २४ तासांत मुसळधारेची शक्यता

पावसाने झोडपले २४ तासांत मुसळधारेची शक्यता

पणजी : बुधवारी दिवसभर जोरदार पाऊस पडल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती होती. दिवसभरात अडीच ते ३ इंच पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर आणखी काही दिवस चालू राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
जोरदार पावसाबरोबरच सोसाट्याचा वाराही सुटला होता. कुंडई येथे आंब्याचे झाड पडून नवदुर्गा देवस्थानचे कार्यालय व एका घराचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशामक दलाकडून देण्यात आली. यात सुमारे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले. चिंबल येथे एका घराची भिंत कोसळली. दिवसभरात अग्निशामक दलाला एकूण २५ कॉल्स आले.
पुढील २४ तासांतही जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पुढील दोन-तीन दिवस गोव्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती बीबीसीच्या हवामानविषयक वृत्तामध्ये दिली आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Rains likely to rattle within 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.