गोव्यात राहुल गांधी यांनी ‘सी फूड’वर मारला ताव !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 04:05 IST2019-01-29T04:05:00+5:302019-01-29T04:05:21+5:30

लोकांबरोबर सेल्फी : रेस्टॉरंटमधील भेट ठरला चर्चेचा विषय; सुरक्षा रक्षकाविना सोनिया, राहुल गांधी यांना पाहून सर्वांनाच आश्चर्य

Rahul Gandhi killed in 'Food' in Goa! | गोव्यात राहुल गांधी यांनी ‘सी फूड’वर मारला ताव !

गोव्यात राहुल गांधी यांनी ‘सी फूड’वर मारला ताव !

मडगाव : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आई सोनिया गांधी यांच्यासह गोव्यात विश्रांतीसाठी आले असून, रविवारी त्यांनी एका रेस्टॉरंटमध्ये माशांवर ताव मारला. कोणत्याही सुरक्षा रक्षकाविना दोघांना पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.

ते दोघे तीन दिवसांच्या खासगी गोवा भेटीवर असून, हॉटेल लीलामध्ये उतरले आहेत. जेवायला गेले, तेव्हा राहुल कॅज्युअल निळ्या टी शर्टमध्ये होते. या दोन्ही काँग्रेस नेत्यांबरोबर काही जणांनी ‘सेल्फी’ही घेतल्या. ही माहिती मडगावच्या डेंटिस्ट डॉ. रचना फर्नांडिस यांनी इन्स्टाग्रामवरून उघड केली. त्यांनीही राहुल यांच्याकडे ‘सेल्फी’चा आग्रह केला असता, रेस्टॉरंटचे बिल भरल्यानंतर फोटो काढणे चालेल का, असे त्यांनी नम्रपणे विचारले. बिल भरल्यावर लगेचच त्यांनी आपल्याबरोबर सेल्फी काढला. गोवा हे गांधी कुटुंबाचे आवडते विश्रांती स्थळ आहे. दर ३१ डिसेंबरला सोनिया गांधी याच हॉटेलमध्ये उतरतात. त्यांच्याबरोबर प्रियंका गांधीही असतात. यावेळी प्रथमच राहुल गांधी आहेत. उद्या, मंगळवारी ते दिल्लीला परतणार आहेत.

ती ऑडिओ क्लिप अस्सलच
राफेल विमान सौद्यातील फाइल्स गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे आहेत, यासंबंधी वाच्यता करणारा आॅडिओ अस्सल असून आपली खुर्ची सांभाळण्यासाठी पर्रीकर या स्फोटक गुप्त माहितीचा वापर करीत आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

ही ऑडिओ क्लिप लोकांसमोर आणून ३0 दिवस उलटले, तरीही अद्याप कुणावरही एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिलेला नाही किंवा कोणत्या मंत्र्यावरही कारवाई झालेली नाही, याचा उल्लेख त्यांनी केला.
 

Web Title: Rahul Gandhi killed in 'Food' in Goa!