पंजाबच्या नवदाम्पत्याची गोव्यात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 04:03 IST2017-10-19T04:03:20+5:302017-10-19T04:03:32+5:30

पंजाबमधील होशियारपूर येथील एका नवदाम्पत्याने कोलवा येथे गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.

 Punjab's widow suicide in Goa | पंजाबच्या नवदाम्पत्याची गोव्यात आत्महत्या

पंजाबच्या नवदाम्पत्याची गोव्यात आत्महत्या

मडगाव : पंजाबमधील होशियारपूर येथील एका नवदाम्पत्याने कोलवा येथे गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. बलजीत सिंग (२५) व हरिंदर कौर (१८) अशी मृतांंची नावे आहेत. या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही.
कोलवा समुद्रकिना-यावरील एका नारळाच्या झाडाला त्यांनी दुपट्ट्याने गळफास घेतला. नऊ आॅक्टोबरला हे जोडपे कोलवा येथे गेस्ट हाऊसमध्ये उतरले होते. दुस-या दिवशी त्यांनी ते गेस्ट हाउस सोडले. नंतर अन्य एका गेस्ट हाऊसमध्ये त्यांनी मुक्काम केला. मंगळवारीच हे गेस्ट हाउसही त्यांनी सोडले. हाती पैसे नसल्याने ते नोकरीच्या शोधात होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली.
घटनास्थळी पोलिसांना मोबाइल सापडला असून त्यात सीमकार्ड नव्हते. ज्या गेस्ट हाउसमध्ये हे जोडपे राहिले होते. तेथे दिलेल्या पत्त्यावर पंजाब, होशियापूर असा उल्लेख आहे. त्यामुळे गोवा पोलीस होशियारपूर पोलिसांकडून माहिती घेत आहेत.

Web Title:  Punjab's widow suicide in Goa