लोकमत दीपोत्सव'चे मुख्यमंत्र्यांकडून प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2024 08:16 IST2024-10-23T08:15:07+5:302024-10-23T08:16:31+5:30

मुख्यमंत्र्यांनी प्रकाशनानंतर संपूर्ण अंक चाळून पाहिला.

publication of lokmat deepotsav by cm pramod sawant | लोकमत दीपोत्सव'चे मुख्यमंत्र्यांकडून प्रकाशन

लोकमत दीपोत्सव'चे मुख्यमंत्र्यांकडून प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'लोकमतच्या दीपोत्सव २०२४' या दिवाळी अंकाचे काल मंगळवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. 'लोकमत'ने यंदाही सर्वप्रथम बाजारपेठेत दिवाळी अंक आणला, हे कौतुकास्पद आहे. मराठी वाचक निश्चितच या दर्जेदार अंकाचे स्वागत करतील, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी प्रकाशनानंतर संपूर्ण अंक चाळून पाहिला. काही लेख व काही मोठ्या राष्ट्रीय बॅण्डच्या जाहिराती पाहून मुख्यमंत्र्यांनी आपल्या सकारात्मक भावनाही व्यक्त केल्या. आल्तिनो पणजी येथे महालक्ष्मी बंगल्यावर प्रकाशन कार्यक्रम झाला. वाचकांमध्ये दिवाळी अंक वाचनाची गोडी कायम राहायला हवी. 'लोकमत' त्यासाठी कष्ट घेत आहे, हे समाधानकारक आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. 'लोकमत'च्या गोवा आवृत्तीचे वरिष्ठ महाव्यवस्थापक संदीप गुप्ते, संपादक सद्‌गुरू पाटील, वितरण विभागप्रमुख बाबासाहेब टकले आदी यावेळी उपस्थित होते.

 

Web Title: publication of lokmat deepotsav by cm pramod sawant