‘लोकमत’च्या गणेशपूजा पुस्तिकेचे प्रकाशन
By Admin | Updated: August 24, 2014 00:50 IST2014-08-24T00:49:29+5:302014-08-24T00:50:58+5:30
मडगाव : ‘लोकमत’तर्फे नेहमीच विविध उपक्रम राबविले जातात़ यंदाच्या गणेशचतुर्थीनिमित्त ‘लोकमत’ने चतुर्थीच्या दिवसांत गजाननाच्या पूजेसंदर्भात मार्गदर्शन

‘लोकमत’च्या गणेशपूजा पुस्तिकेचे प्रकाशन
मडगाव : ‘लोकमत’तर्फे नेहमीच विविध उपक्रम राबविले जातात़ यंदाच्या गणेशचतुर्थीनिमित्त ‘लोकमत’ने चतुर्थीच्या दिवसांत गजाननाच्या पूजेसंदर्भात मार्गदर्शन करणारी ‘गणेशपूजा’ पुस्तिका प्रसिद्ध केली असून या पुस्तिकेचे शनिवारी मडगावात प्रकाशन करण्यात आले.
बोर्डा-मडगाव येथील क्वॉड्रोस मोटर्स या कंपनीच्या सुझुकी शोरुममध्ये झालेल्या या सोहळ्याला क्वॉड्रोस मोटर्सचे चेअरमन इव्हेसियो क्वॉड्रोस, ‘लोकमत’चे संपादक राजू नायक, महाव्यवस्थापक संदीप गुप्ते, तसेच जाहिरात व्यवस्थापक विजू पिल्ले, साहाय्यक जाहिरात व्यवस्थापक कल्पेश काटकर उपस्थित होते. या पुस्तिकेत श्रीगणेशाच्या प्राणप्रतिष्ठापनेपासून षोडशोपचार पूजा, अथर्वशीर्ष, गणपतीच्या इतर आरती, मंत्रपुष्पांजली, उत्तरपूजा या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे़ त्याशिवाय चतुर्थीनिमित्त गोव्यात तयार केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची रेसिपी, नैवेद्य, गोव्यातील प्राचीन गणपतीच्या मूर्ती, माटोळी तसेच गणेशोत्सवामागील पर्यावरणीय वारसा या संदर्भात माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, हा उपक्रम क्वॉड्रोस मोटर्सने पुरस्कृत केला आहे. ही पुस्तिका गोव्यातील लोकांना उपयोगी ठरेल, असे मत क्वॉड्रोस यांनी व्यक्त केले. या पुस्तिकेत क्वॉड्रोस यांनी दिलेल्या संदेशात आपल्या कंपनीचा ग्राहकांप्रती असलेल्या कटिबद्धतेचा निर्वाळा दिला आहे. (प्रतिनिधी)