शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जनतेनेही जागृती उपक्रमात सहभागी व्हावे, हरित, गोव्यासाठी कटिबद्ध; पर्यावरणदिनी मुख्यमंत्र्यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 07:42 IST

जनतेने जर सहकार्य केले, तर पर्यावरणाचा ऱ्हास रोखणे सहज शक्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जागतिक पर्यावरणदिनाच्या पूर्वसंध्येला आपल्या भावना व्यक्त करताना केले.

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : जागतिक पातळीवर हवामान बदल व इतर अनेक समस्यांमुळे पर्यावरणाला धोका पोहोचलेला असताना राज्य सरकारने पर्यावरण रक्षण, हरित व नितळ गोव्यासाठी व कचरामुक्त गोव्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना, प्रकल्प राबवलेले आहेत. या प्रक्रियेत राज्य सरकार कुठेही कमी पडलेले नाही. मात्र, जनतेचा सहभाग महत्त्वाचा मानला जात आहे. जनतेने जर सहकार्य केले, तर पर्यावरणाचा ऱ्हास रोखणे सहज शक्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जागतिक पर्यावरणदिनाच्या पूर्वसंध्येला आपल्या भावना व्यक्त करताना केले.

कचरा व्यवस्थापनात देशातील गोवा राज्य हे पहिले राज्य असून देश पातळीवर अनेक प्रकल्प राबवण्यासाठी गोवा सरकार आदर्श ठरत आहे. गोव्यातील दोन कचरा प्रक्रिया प्रकल्प देशातील आदर्श प्रकल्प आहेत. राज्यातील नद्या, नैसर्गिक जलसाठे यांचे रक्षण गरजेचे आहे. त्यासाठी राज्यातील व्यक्तीने योगदान द्यावे, असे आवाहन केले.

जबाबदारी ओळखा

व्यावसायिक तसेच वेगवेगळ्या उद्योजक, सामान्य नागरिक या प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून कचरा व्यवस्थापनामध्ये योग्य प्रकारचे समन्वय साधणे गरजेचे आहे. प्रत्येक गोष्ट सरकार करू शकत नाही. सरकार पर्यावरण रक्षण कचरा निर्मूलन, हरित निर्मळ गोव्यासाठी योजना राबवत आहे.

कचरा निर्मूलनासाठी प्रत्येकाने सुरुवात करावी

मला काय त्याचे... ही वृत्ती झटका व प्रत्येक घरापासून ओला, सुका कचरा, प्लास्टिक मुक्ती व इतर कचरा याबाबत जर व्यवस्थापन प्रत्येकाने घरोघरी केले, पंचायतीने त्यासाठी विशेष पुढाकार घेतला, तर निश्चितपणे कचरा निर्मूलन व एकूण निसर्गाचा समतोल राखताना हरित गोवाचा संकल्प सिद्धीस नेणे शक्य आहे. मोठ्या प्रमाणात वृक्ष संवर्धन, वृक्ष लागवड व इतर बाबतीत महत्त्वपूर्ण अशा योजना ज्या सरकार सातत्याने राबवत आहे त्याला जनतेचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येक गोष्ट सरकार करणार, हा जो समज आहे तो बदला. 'एक पेड माँ के नाम' हा संकल्प सिद्धीस नेताना विद्यार्थी युवा, युवतींनी निसर्ग पर्यावरण रक्षण करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतWorld Environment DayWorld Environment Dayenvironmentपर्यावरण