हणजुणात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश;विदेशी नागरिकासह चार दलालां विरोधात गुन्हा दाखल
By काशिराम म्हांबरे | Updated: December 14, 2023 16:10 IST2023-12-14T16:09:01+5:302023-12-14T16:10:04+5:30
हणजूण परिसरात सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

हणजुणात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश;विदेशी नागरिकासह चार दलालां विरोधात गुन्हा दाखल
काशीराम म्हांबरे, म्हापसा: हणजूण परिसरात सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कारवाईत दोन केनीया देशातील युवतींची सुटका करुन दोन विदेशी नागरिकासह चार दलालां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हणजूण पोलीस स्थानकाचे निरीक्षक प्रशल देसाई यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी मध्यरात्रीच्या अंदाजाला ही कारवाई करण्यात आली. पोलीस स्थानकाच्या हद्दीत वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना उपलब्ध झाली होती. सुरु असलेल्या या व्यवसायावर कारवाईसाठी विशेष पथक तयार करुन धाड घालण्यात आली.
कारवाईच्या दरम्यान काही विदेशी नागरिक गुंतल्याचेआढळून आले. या कारवाईत दोन विदेशी युवतींची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली. सुटका करण्यात आलेल्या युवतींची रवानगी मेरशे येथील अपना घरात करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या प्रकरणात चार दलालांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघे विदेशी नागरिक आहेत. या प्रकरणी अधिक तपास प्रशल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.