वेश्या व्यवसाय प्रकरणात अहमदनगर व दिल्लीच्या दलालांना गोव्यात अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 23:07 IST2017-12-11T23:07:18+5:302017-12-11T23:07:29+5:30
पणजी: देशातील विविध राज्यांतून युवती गोव्यात आणून त्यांना वेश्या व्यवसायाला लावणा-या एका महिलेस आणि युवकास पणजी पोलिसांनी एका हॉटेलमध्ये छापा टाकून अटक केली.

वेश्या व्यवसाय प्रकरणात अहमदनगर व दिल्लीच्या दलालांना गोव्यात अटक
पणजी: देशातील विविध राज्यांतून युवती गोव्यात आणून त्यांना वेश्या व्यवसायाला लावणा-या एका महिलेस आणि युवकास पणजी पोलिसांनी एका हॉटेलमध्ये छापा टाकून अटक केली. कांपाल येथील मुंडियाल पॅलेस या हॉटेलात संशयित युवतीला गि-हायकाच्या स्वाधीन करताना पोलिसांनी छापा टाकला आणि पुराव्यासह अटक केली.
अटक करण्यात आलेल्यात एक २५ वर्षीय महिला असून तिचे नाव साधना देशमुख असे आहे. गुलेवाडी, संगमनेर अहमदनगर असा तिचा पत्ता आहे. दुस-या संशयिताचे नाव माणिक आठोळे असे असून तो दिल्ली येथील बोराला-अमरावती येथील आहे. दोघांनाही अटक करून रिमांडवर कोठडीत ठेवण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परराज्यातील युवतींना गोव्यात आणून संशयित वेश्याव्यवसायाला लावत होते. त्यांच्या कमाईवर दोघे डल्ला मारत होते. सर्व व्यवहार मोबाईलवर होत होते. व्हॉट्सअपवरून युवतीचा फोटो गि-हायकाला पाठविला जात होता. तसेच एका वेळी २० हजार रुपयांपेक्षा अधिक दर आकारला जात होता. पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर नियोजनबद्ध कारवाई करून त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. युवतीला घेऊन आलेली एर्टिगा कार जप्त करण्यात आली आहे. तसेच युवतीला मेरशे येथील अपनाघरमध्ये ठेवण्यात आले आहे.