शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

मालमत्ता अहवाल प्रकरण : गोव्यातील शेकडो पंच, सरपंचांची नावे व पत्ते मिळवले लोकायुक्तांनी 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2017 6:30 PM

राज्यातील शेकडो पंच सदस्य, उपसरपंच, सरपंच तसेच जिल्हा पंचायत सदस्य यांनी त्यांच्या मालमत्तेचा तपशील सादर न केल्यामुळे लोकायुक्तांनी सरकारकडून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवरील सर्व लोकप्रतिनिधींची नावे व पत्ते मिळविले आहेत.

पणजी : राज्यातील शेकडो पंच सदस्य, उपसरपंच, सरपंच तसेच जिल्हा पंचायत सदस्य यांनी त्यांच्या मालमत्तेचा तपशील सादर न केल्यामुळे लोकायुक्तांनी सरकारकडून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवरील सर्व लोकप्रतिनिधींची नावे व पत्ते मिळविले आहेत. यापुढे प्रत्येक लोकप्रतिनिधीला नोटीस पाठवावी किंवा त्यांनी मालमत्तेचा तपशील सादर केलेला नाही असे मुख्य सचिवांना कळवावे, असे लोकायुक्तांनी तत्त्वत: ठरविले असल्याची माहिती मिळाली. गोवा लोकायुक्त कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक पंच सदस्याने, नगरसेवक, नगराध्यक्ष, सरपंच, जिल्हा पंचायत सदस्य अशा लोकप्रतिनिधींनीही आमदारांप्रमाणोच स्वत:च्या मालमत्तेचा व स्वत:वरील कर्जाचाविषयीचा अहवाल दरवर्षी लोकायुक्तांना सादर करणे गरजेचे असते. 

बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी अजून एकदाही लोकायुक्तांना असा अहवाल सादर केलेला नाही. 90 टक्के पंच सदस्यांनी, नगरसेवकांनी एकदादेखील अहवाल दिलेला नाही. याबाबत लोकायुक्तांकडून आरटीआय कार्यकत्र्याची याचिका सादर होताच, लोकायुक्तांनी दखल घेऊन कायद्यानुसार पाऊले उचलणो सुरू केले आहे. 

पंचायत खात्याचे संचालक व पालिका प्रशासन खात्याचे संचालक यांना लोकायुक्तांनी पत्रे लिहून स्थानिक स्वराज्य संस्थांवरील सर्व लोकप्रतिनिधींची नावे व पत्ते सादर करण्यास सांगितले. त्यानुसार संचालकांनी माहिती सादर केली आहे. अवघ्याच पंच सदस्यांनी व जिल्हा पंचायत सदस्यांनी तसेच नगरसेवकांनी अलिकडेच मालमत्तेचा अहवाल दिला पण बहुतांश अजून त्याबाबत बेफिकीर आहेत.लोकायुक्तांनी प्रत्येकाला नोटीस पाठवून लोकायुक्त कायद्यातील तरतुदीची जाणीव करून द्यावी की थेट आपला अहवाल तयार करून तो मुख्य सचिवांना व राज्यपालांना सादर करावा याबाबत निर्णय अजून घेतलेला नाही पण त्याविषयी त्यांनी विचार चालवला आहे. येत्या आठवड्या लोकायुक्तांचा निर्णय होणार आहे, असे त्यांच्या कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. 

किनारपट्टीतील काही पंचायती या खूप श्रीमंत असतात. तेथील पंच, सरपंच यांचीही आर्थिक स्थिती लवकरच फुगते. विविध पंच सदस्यांवर यापूर्वी लाचखोरीचे आरोप झालेले आहेत, तर काही जणांना एसीबीने रंगेहाथ पकडल्याचीही उदाहरणो आहेत. पंच, सरपंच, नगरसेवक आदी घटक एकदा मालमत्तेचा तपशील लोकायुक्तांना सादर करू लागले की, मग स्थानिक स्वराज्य संस्थांमधील गब्बर लोकप्रतिनिधींची अधिकृतरित्या जाणीव सर्वानाच होणार आहे. यामुळेही काही पंच सदस्य, नगरसेवक, नगराध्यक्ष वगैरे लोकायुक्तांना माहिती सादर करण्यास टाळाटाळ करतात, असे कळते. 

टॅग्स :goaगोवा