शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

गोव्यात साडेतीन लाख लिटर हॅण्ड सॅनिटायझरचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 22:48 IST

अबकारी आयुक्त अमित सतिजा यांनी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत ही माहिती दिली.

पणजी : गोव्यात मद्य उत्पादकांना सरकारने लॉकडाउनच्या काळात मद्य निर्मितीऐवजी हॅण्ड सॅनिटायझरचे उत्पादन करण्यास सरकारने सांगितले होते. त्यानुसार या उद्योगांनी साडेतीन लाख लिटर हॅण्ड सॅनिटायझरचे उत्पादन केले. 

अबकारी आयुक्त अमित सतिजा यांनी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत ही माहिती दिली. लॉकडाउनमुळे सध्या मद्यनिर्मिती बंद आहे. दारुची घाऊक व किरकोळ दुकाने तसेच बार, तावेर्नही बंद आहेत. लॉकडाउनच्या काळात छुपी दारु विक्री करुन मार्गदर्शक

तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल आतापर्यंत २0 प्रकरणांमध्ये सुमारे ७९ लाख ४१ हजार रुपये किमतीची २0 हजार लिटर दारु जप्त करण्यात आली. राज्यातील वाइन शॉप खुली करण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी गोवा लिकर ओनर्स असोसिएशनने केली आहे. 

- मद्य उत्पादन बंद असले तरी मद्याचे कारखाने सॅनिटायझर निर्मितीसाठी चालू आहेत. - लॉकडाउनचे नियम शिथिल झाल्यानंतर आतापर्यंत औद्योगिक वसाहतींमधील सर्व प्रकारच्या कारखान्यांमध्ये ५0 हजार कामगार कामावर रुजू झाले आहेत. - १६,२00 कामगार केवळ फार्मास्युटिकल्स उद्योगांमध्ये काम करत आहेत.- बांधकाम क्षेत्रात ३0५८, इ कॉमर्समध्ये ५३२ तर आयटी क्षेत्रात ५४६ कार्मचारी काम करीत आहेत. 

टॅग्स :goaगोवा